Nikolaas Davine made history by retired out : पावसाने प्रभावित झालेल्या टी-२० विश्वचषकाच्या ३४व्या सामन्यातइंग्लंडने नामिबियाचा ४१ धावांनी पराभव केला. हा सामना जिंकल्यानंतर इंग्लंडचे ५ गुण झाले होते. यानंतर ऑस्ट्रेलियाने स्टॉटलंडला पराभूत केल्याने इग्लंडचा संघ सुपर-८ फेरीत दाखला झाला आहे. त्तत्पूर्वी इंग्लंड- नामिबियाचा सामना पावसामुळे सामना १०-१० षटकांचा करण्यात आला होता, ज्यामध्ये इंग्लंडने नामिबियार मात करत सुपर-९ फेरीत पोहोचण्याच्या आशा कायम ठेवल्या होत्या. या सामन्यात नामिबियाचा स्टार फलंदाज निकोलास डेव्हिनने ‘रिटायर्ड आऊट’ होत विश्वचषकात इतिहास रचला आहे.

निकोलास डेव्हिन ‘रिटायर्ड आऊट’ होणारा पहिला फलंदाज –

१० षटकांत मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या नामिबियाच्या संघाला मायकेल लिंगेनने चांगली सुरुवात करून दिली. दुसरीकडे, निकोलास डेव्हिन धावा काढताना संघर्ष करताना दिसत होता. त्यामुळे १६ चेंडूत १८ धावा केल्यानंतर निकोलास डेव्हिन सहाव्या षटकात रिटायर्ड आऊट झाला. त्याच्या जागी डेव्हिड वीस फलंदाजीला आला. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखादा खेळाडू ‘रिटायर्ड आऊट’ झाला आहे. रिटायर्ड आऊट होण्यापूर्वी प्रथम फलंदाज अंपायरला सांगतो की तो क्रीज सोडत आहे.

Chris Gayle Stormy Half Century
WCL 2024 : ४४व्या वर्षी ख्रिस गेलचा झंझावात; चौकार-षटकारांनी पुन्हा जिंकली चाहत्यांची मनं, VIDEO व्हायरल
Shubman Gill reaction to India win
IND vs ZIM 2nd T20 : रेकॉर्ड ब्रेकिंग विजयानंतर शुबमन गिलचे मोठे वक्तव्य; म्हणाला,”आज काय होणार आहे हे…”
Rahul Dravid Makes Bold Prediction About Virat Kohli
IND vs SA T20 WC Finals: विराट कोहलीच्या भूमिकेबाबत राहुल द्रविडचं मोठं विधान; म्हणाला, “काही मोठे बदल..”
Rohit Sharma's Flying Kiss Video Viral After India's Defeat of England
IND vs ENG : आधी संघाला विजयी केले, मग जिंकले रितिकाचे मन, मैदानावर दिसले रोहित शर्माचे नवे रुप, पाहा VIDEO
Watch: Rahul Dravid consoles heartbroken Virat Kohli after another cheap dismissal
IND vs ENG Semifinal : राहुल द्रविडने निराश विराटला दिला धीर, सांत्वन करतानाचा VIDEO व्हायरल
T20 World Cup 2024 India vs England Semi Final 2 Match Preview in Marathi
IND vs ENG Semi Final 2 : पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोणत्या संघाला होणार फायदा?
Argentina beat Canada by 20 points in the first match
अर्जेंटिना संघाची दमदार सुरुवात; पहिल्याच सामन्यात कॅनडावर २० अशी सरशी; मेसीची चमक
West Indies Brandon King Injured in Super 8 Stage
T20 World Cup 2024 : वेस्ट इंडिजच्या सुपर ८ फेरीत वाढल्या अडचणी, ‘या’ धडाकेबाज खेळाडूला झाली दुखापत

अश्विनही झाला होता ‘रिटायर्ड आऊट’ –

आयपीएल २०२२ मधील एका सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स आमनेसामने आले होते. या सामन्यात शिमरोन हेटमायर आणि रविचंद्रन अश्विन यांनी अर्धशतकी भागिदारी केली होती. मात्र संघाच्या हितासाठी १९ व्या षटकात अश्विन २८ धावांवर “रिटायर्ड आऊट’ झाला. कारण तो रियान परागप्रमाणे आक्रमक फटकेबाजी करण्यात कमी पडत होता, त्यामुळे अश्विन रिटायर्ड आऊट होऊन परतला. ज्यामुळे रियान परागला फलंदाजीसाठी येण्याची संधी मिळाली होती. अशा प्रकारे आयपीएलच्या इतिहासात रिटायर्ड आऊट होणारा अश्विन पहिलाच फलंदाज आहे.

हेही वाचा – VIDEO : ‘हमारा नेता कैसा हो, कोहली जैसा हो…’, लाइव्ह मॅचमध्ये चाहत्यांनी दिल्या घोषणा, विराट पुन्हा होणार कर्णधार?

काय आहे रिटायर्ड आऊटचा नियम?

एमसीसीच्या नियम २५.४.३ नुसार, जर फलंदाजाने २५.४.२ (आजार, दुखापत किंवा इतर कोणतेही अपरिहार्य कारण) व्यतिरिक्त कोणत्याही कारणास्तव मैदान सोडले तर, खेळाडू फक्त तेव्हाच फलंदाजीसाठी परत येऊ शकतो. जेव्हा विरोधी कर्णधार परवानगी देतो. कोणत्याही कारणास्तव फलंदाज त्याचा डाव पुन्हा सुरू शकणार नसेल, तर फलंदाज ‘रिटायर्ड आऊट’ म्हणून समजला जातो. दुसरीकडे, जेव्हा एखाद्या खेळाडूला पंचाकडून रिटायर्ड हर्ट घोषित केले जाते, तेव्हा तो पुन्हा फलंदाजीला येऊ शकतो, यामध्ये त्याला विरोधी कर्णधाराच्या संमतीची आवश्यकता नसते.