Sachin Tendulkar tweeted and gave important advice to England: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात हेडिंग्ले येथे ॲशेस मालिकेतील तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. सध्या या सामन्यात इंग्लंडची स्थिती मजबूत दिसत आहे. त्यांना विजयासाठी २२४ धावांची गरज आहे. ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी खूप मजबूत असली तरी इंग्लंड संघ हा सामना जिंकण्याचा प्रबळ दावेदार आहे.अशा परिस्थितीत मालिकेत २-० ने पिछाडीवर असलेला बेन स्टोक्सचा संघ कसा विजय मिळवू शकतो, याची योजना खुद्द क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने सांगितली आहे.

इंग्लंडचा संघ असा विजय नोंदवू शकतो –

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जाणाऱ्या ॲशेस मालिकेची प्रचंड क्रेझ निर्माण झाली आहे. सचिन तेंडुलकरही त्याचे बारकाईने निरीक्षण करत आहे. अशा स्थितीत त्याने हेडिंग्ले कसोटीचा तिसरा दिवस संपल्यानंतर एक ट्विट करून इंग्लंडला जिंकण्याची योजना सांगितली. मास्टर ब्लास्टरच्या मते, बेन स्टोक्सच्या संघाला समजूतदारपणाने आणि शिस्तीने फलंदाजी करावी लागेल तरच ते जिंकतील.

Marcus Stoinis Highest individual scores in IPL run chases with 124 Runs
IPL 2024: मार्कस स्टॉइनसची ऐतिहासिक खेळी, आयपीएलच्या इतिहासात ही कामगिरी करणारा पहिला फलंदाज
IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: आशुतोष शर्माची आयपीएलमध्ये ऐतिहासिक कामगिरी, १७ वर्षांच्या इतिहासात ही कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
Abhishek Sharma Breaks Chris Gayle and Sunil Narine's Record in SRH vs CSK Match
SRH vs CSK : अभिषेकने वादळी खेळीच्या जोरावर मोडला गेल-नरेनचा विक्रम, IPL मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024: मयंक यादवचा सामना करायला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज उत्सुक

मास्टर ब्लास्टर सचिनने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “हेडिंग्ले येथे उद्याचा (रविवार) पहिला तास महत्त्वाचा असणार आहे. मला वाटते की विकेट पूर्णपणे चांगली खेळत आहे आणि जर इंग्लंडने समजूतदारपणे फलंदाजी केली आणि त्यांचा दृष्टिकोन सकारात्मक असेल तर ते तिथे पोहोचतील. त्यांना त्याच्या शॉटच्या निवडीमध्ये सकारात्मक दृष्टिकोनाची शिस्त हवी आणि अशा प्रकारे ते लक्ष्याचा पाठलाग करू शकतील.”

हेही वाचा – MS Dhoni 42nd Birthday: माहीने आपल्या खास लोकांसोबत साजरा केला वाढदिवस, पाहा सेलिब्रेशनचा VIDEO

जेव्हा हेडिंग्ले कसोटीच्या तिसर्‍या दिवशीचा खेळ संपला, तेव्हा इंग्लंडने दुसऱ्या डावात बिनबाद २७ धावा केल्या होत्या. बेन डकेट १८ आणि जॅक क्रॉली नऊ धावांवर नाबाद आहेत. तत्पूर्वी, तिसर्‍या दिवशी ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या दिवसाच्या ४ बाद ११६ धावांच्या पुढे खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. परंतु त्यांचा संघ २२४ धावांवर गारद झाला. अशाप्रकारे इंग्लंडला विजयासाठी २५१ धावांचे लक्ष्य मिळाले. तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात २६३ आणि इंग्लंडने २३७ धावा केल्या होत्या. कांगा