Sanjay Manjrekar statement on Yuzvendra Chahal : माजी भारतीय खेळाडू संजय मांजरेकर यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी युजवेंद्र चहलच्या निवडीबद्दल आश्चर्य व्यक्त केले. युजवेंद्र चहल बराच काळ भारताच्या वनडे संघातून बाहेर होता. चहलला ना आशिया चषक २०२३ मध्ये संधी मिळाली होती, ना २०२३ च्या विश्वचषकासाठी निवड झाली होती. उजव्या हाताचा लेग स्पिनर विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळताना दिसला, जिथे त्याने आपल्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर निवडकर्त्यांना प्रभावित केले आणि पुनरागमन करण्यात यश मिळवले.

भारताला प्रथम दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टी-२० मालिका खेळायची आहे, ज्यामध्ये कर्णधारपदाची जबाबदारी सूर्यकुमार यादववर आहे. यानंतर केएल राहुल एकदिवसीय मालिकेत तर रोहित शर्मा कसोटी मालिकेत टीम इंडियाचे कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे. या तिन्ही मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा खूप दिवसांपूर्वी करण्यात आली होती.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

स्टार स्पोर्ट्सच्या ‘गेम प्लान’ या कार्यक्रमात आगामी एकदिवसीय मालिकेत चहलच्या निवडीबाबत चर्चा करताना संजय मांजरेकर म्हणाले, “दीपक चहर संघात परत आल्याने मी उत्साहित आहे. मला तो आवडतो. आवेश खानला आणखी एक संधी मिळाली ही आनंदाची बातमी आहे. मला विश्वास आहे की मुकेश कुमार हा भरवशाचा गोलंदाज आहे आणि त्याचीही निवड झाली आहे. मात्र चहलचा समावेश आश्चर्यकारक आहे. माझा विश्वास आहे की चहल हा टी-२० साठी योग्य गोलंदाज आहे, पण तिथेही रवी बिश्नोई हा त्याचा पर्याय आहे.”

हेही वाचा – WPL 2024 Auction : टॅक्सी ड्रायव्हरची मुलगी बनली लखपती; दिनेश कार्तिकने सांगितले, कोण आहे कीर्तना बालकृष्णन?

युजवेंद्र चहलच्या वनडे गोलंदाजीची आकडेवारी –

एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये, निवडकर्त्यांनी चहलकडे दुर्लक्ष केले होते. निवडकर्त्यांनी तिसरा फिरकी गोलंदाज म्हणून आर अश्विनची निवड केली होती, ज्याला विश्वचषकातील फक्त एका सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती. ३३ वर्षीय युजवेंद्र चहलने ७२ सामन्यांच्या ६९ डावांमध्ये १२१ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर ५.२६ च्या इकॉनॉमी रेटने धावा केल्या आहेत. चहलने ५ वेळा एका डावात ४ विकेट्स आणि एकदिवसीय सामन्यात दोन वेळा एका डावात ५ विकेट्स घेतल्या आहेत.

हेही वाचा – BBL 2023 : बीसीसीआयवर टीका करणाऱ्या ऑस्ट्रेलियाची झाली नाचक्की! बीबीएलमध्ये सहा षटकानंतर सामना…

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारताचा संघ :

ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, केएल. राहुल (कर्णधार/यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग, दीपक चहर.

Story img Loader