रेड बुल संघाच्या सेबॅस्टियन व्हेटेल याने कोरियन ग्रां.प्रि.शर्यतीत विजेतेपद मिळविले. व्हेटेलने या शर्यतीत सुरुवातीपासून आघाडीचे स्थान घेत लोटस संघाचे स्पर्धक किमी रैक्कोनन व रोमेन ग्रोसजेन यांच्यावर मात केली. शर्यतीमधील संभाव्य विजेता मानला गेलेल्या फर्नाडो अलोन्सो याला सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. व्हेटेल याने येथील विजेतेपदासह या शर्यतींच्या मालिकेत ७७ गुणांची आघाडी घेतली आहे. सुझुका येथे पुढील आठवडय़ात जपान खुली स्पर्धा होणार आहे. त्यामध्ये विजेतेपद मिळविल्यास तो यंदाचा मालिकावीर होण्याची शक्यता आहे. सौबर संघाच्या निको हुल्केनबर्ग याने येथील शर्यतीत १७ व्या फेरीपर्यंत व्हेटेल याला चांगली लढत दिली होती, मात्र त्याला अपेक्षेइतका वेग ठेवता आला नाही. त्याला येथे दुसरे स्थान मिळाले. रैक्कोनन व ग्रोसजेन यांनी अनुक्रमे तिसरा व चौथा क्रमांक मिळविला. मसिर्डीज संघाच्या लेवीस हॅमिल्टन याला पाचवे स्थान मिळाले, तर त्याचा सहकारी निको रोसबर्ग याला सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.