जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात झालेल्या अतिरेकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) च्या ४० जवानांना हौतात्म्य स्विकारावं लागलं होतं. या हल्ल्यानंतर देशभरात सर्वत्र संतापाची लाट पसरली होती. या घटनेनंतर समाजातील प्रत्येक जण आपापल्यापरीने शहीद परिवाराच्या कुटुंबियांना मदत करत आहे. अनेक सामाजिक संस्था या कार्यात मोलाच्या भूमिका बजावत आहेत. अशावेळी विरेंद्र सेहवागने आपली सामाजिक जबाबदारी राखत मोठं पाऊल उचललं आहे.

विरेंद्र सेहवागने पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलण्याचं मान्य केलं आहे. आपल्या ट्वीटर हँडलवरुन सेहवागने यासंदर्भातली घोषणा केली आहे. शहीदांच्या कुटुंबासाठी आपण इतकी गोष्ट करु शकत असल्याचं सेहवागने म्हटलं आहे.