भारतीय संघाने विराट कोहीलच्या नेतृत्वाखाली २०२० या वर्षाची सुरुवात मालिका विजयाने केली. श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने ७८ धावांनी बाजी मारली. या विजयासह भारताने ३ टी-२० सामन्यांची मालिका २-० ने जिंकली. नवीन वर्षातला भारतीय संघाचा हा पहिला मालिका विजय ठरला.

“मला जमलं नाही…”; पराभवानंतर मलिंगा झाला भावनिक

या सामन्यात एक महत्त्वाचा बदल पाहायला मिळाला. भारतीय संघात ऋषभ पंतच्या जागी संजू सॅमसनला स्थान देण्यात आले. ऋषभ पंत सातत्याने अपयशी होत असल्याचे त्याच्या जागी इतर खेळाडूला संधी द्यायला हवी असा सूर गेले काही महिने उमटत आहे. अखेर तिसऱ्या टी २० सामन्यात पंतला संघाबाहेर बसवून त्या जागी संजू सॅमसनला संधी देण्यात आली. संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयाबाबत शिखर धवनने भूमिका स्पष्ट केली.

संजू सॅमसन[/caption]

IND vs SL : हे आहेत ‘टीम इंडिया’च्या विजयाचे शिल्पकार…

“संघ व्यवस्थापनाला सध्या विविध खेळाडूंना संधी द्यायची आहे. तिसऱ्या सामन्यातदेखील संघ व्यवस्थापनाला आणि आम्हाला असा खेळाडू हवा होता, ज्याने या मालिकेत अद्याप फलंदाजी केलेली नाही. जेणेकरून सगळ्यांना फलंदाजीची समान संधी मिळेल. कारण टी २० विश्वचषक स्पर्धेआधी भारताकडे फार कमी टी २० सामने शिल्लक आहेत”, असे धवनने सांगितले.

LBW नाही तर Run Out… विकेट तर घेणारच!; पाहा बुमराहचा भन्नाट Video

“संघ म्हणून आम्हाला प्रत्येक खेळाडूला संधी द्यायची आहे. त्यामुळे विविध मालिकेत विविध खेळाडूंना संघात स्थान दिले आहेत. याचा फायदा असा होईल की विश्वचषक स्पर्धा २०२० पर्यंत प्रत्येक खेळाडूला त्याची जबाबदारी आणि भूमिका समजेल. त्याचा मूळ स्पर्धेत आम्हाला खूप उपयोग होईल”, असेही धवनने नमूद केले.

Video : सुपर यॉर्कर! सैनीने उडवला फलंदाजाचा भन्नाट त्रिफळा

भारताची १४ जानेवारीपासून ऑस्ट्रेलियाविरूद्ध वन-डे मालिका सुरू होणार आहे. त्यानंतर टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे.