Sunil Gavaskar has selected his India playing XI for 1st Test : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना २६ डिसेंबरपासून सेंच्युरियन येथे होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १:३० वाजता सुरू होईल. भारताने कसोटी मालिकेसाठी अनुभवी आणि तरुण खेळाडूंचा संघ उतरवला आहे. क्रिकेट विश्वचषकाच्या फायनलनंतर विराट कोहली, कर्णधार रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांचा हा पहिला सामना असेल. या सामन्यापूर्वी माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी आपली प्लेइंग इलेव्हन निवडली आहे.

भारत दोन फिरकीपटूंसोबत जाणार का?

सेंच्युरियन कसोटी सामन्यात सर्वांच्या नजरा टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनवर असतील. या सामन्यासाठी योग्य संयोजन शोधणे भारतीय संघ व्यवस्थापनासाठी कठीण काम असणार आहे. सेंच्युरियनची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी उपयुक्त मानली जाते. अशा परिस्थितीत रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा या दोघांना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळते की नाही हे पाहावे लागेल.

Delhi beat Gujarat by 4 runs Shubman Gill reacts to defeat
DC vs GT : दिल्लीविरुद्धच्या पराभवानंतर कर्णधार शुबमन गिल संतापला, ‘या’ खेळाडूला धरले जबाबदार
Who is fast bowler Sandeep Sharma
IPL 2024 : पाच सामन्यांनंतर परतला आणि मुंबई इंडियन्सच्या डावाला खिंडार पाडणारा संदीप शर्मा कोण?
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनी कुठल्या दुखापतीसह खेळतोय? मुंबईविरूद्ध सामन्यानंतर सीएसकेच्या एरिक सिमन्स यांचे मोठे वक्तव्य
Kolkata Knight Riders Vs Lucknow Supergiants Match Updates in Marathi
KKR vs LSG : कोलकाताविरुद्धच्या सामन्यासाठी लखनऊच्या संघाने जर्सीचा रंग का बदलला? जाणून घ्या

गावसकरांनी आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये या खेळाडूंना दिली संधी –

सुनील गावसकर यांनी पहिल्या कसोटीसाठी रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांची सलामीवीर म्हणून निवड केली आहे. यानंतर तिसऱ्या क्रमांकासाठी शुबमन गिल तर विराट कोहलीची चौथ्या क्रमांकासाठी निवड केली आहे. यानंतर सुनील गावसकरांच्या टीममध्ये श्रेयस अय्यरचाही समावेश आहे. विशेष म्हणजे गावसरांनी जडेजा आणि अश्विन या दोघांनाही आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये ठेवले आहे. स्टार स्पोर्ट्सवर आपली प्लेइंग इलेव्हन निवडताना गावस्कर म्हणाले की, पहिल्या कसोटीत भारताने तीन वेगवान गोलंदाजांसह उतरले पाहिजे.

हेही वाचा – SA vs IND Test : ‘आमचे रबाडा आणि एनगिडी…’, मालिकेपूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या प्रशिक्षकाने टीम इंडियाला दिला इशारा

गावसकरांनी विकेटकीपर फलंदाज म्हणून केएल राहुलची निवड केली. त्याचबरोबर वेगवान गोलंदाजीत त्यांना जसप्रीत बुमराह, मुकेश कुमार आणि मोहम्मद सिराज यांचा समावेश केला. म्हणजेच गावसकरांना आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरला स्थान दिलेले नाही. शार्दुलला पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – Year Ender 2023 : विराट-जडेजाने नव्हे, तर ‘या’ खेळाडूने उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाने रचला इतिहास, मोडला २५ वर्षे जुना विक्रम

पहिल्या कसोटी सामन्यासाठी सुनील गावसकरांची प्लेइंग इलेव्हन: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.