T20 World Cup : बांगलादेशपुढे बलाढय़ इंग्लंडचे आव्हान

सलामीचा सामना गमावणारा बांगलादेशचा संघ त्यांना धक्का देणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

अबू धाबी : अव्वल-१२ फेरीतील पहिल्या लढतीत गतविजेत्या वेस्ट इंडिजचा फडशा पाडल्यानंतर विजयी कामगिरीत सातत्य राखण्यासाठी इंग्लंडचा संघ उत्सुक आहे. मात्र सलामीचा सामना गमावणारा बांगलादेशचा संघ त्यांना धक्का देणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

वेळ : दुपारी ३.३० वा.

स्कॉटलंडला धक्का देण्यास नामिबिया प्रयत्नशील

अबू धाबी : सलग दोन उत्कृष्ट विजयांसह पदार्पणातच ‘अव्वल-१२’ फेरी गाठणारा नामिबियाचा संघ ट्वेन्टी-२० विश्वचषकातील बुधवारी होणाऱ्या सामन्यात स्कॉटलंडला पराभवाचा धक्का देण्यासाठी प्रयत्नशील आहे. स्कॉटलंड मात्र सलग दुसरा पराभव टाळण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. वेळ : सायंकाळी ७.३० वा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: T20 world cup england face bangladesh challenge in tricky conditions

Next Story
फेलिक्स बॉमगार्टनर
ताज्या बातम्या