Naveen Ul Haq reacts to the controversy with Virat Kohli: एकदिवसीय विश्वचषक २०२३ मधील ९वा सामना भारत आणि अफगाणिस्तान संघांत खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने अफगाणिस्तानवर ८ विकेट्सने एकतर्फी विजय मिळवला. मात्र, या सामन्यादरम्यान आयपीएल २०२३ मधून विराट-नवीनमध्ये सुरु झालेला वाद बुधवारी संपुष्टात आला. या सामन्यात विराट कोहली आणि नवीन उल हकने मागील वाद विसरुन एकमेकांना मिठी मारली. यानंतर चाहते खूश दिसून आले. आता नवीन उल हकने आयपीएल २०२३ मध्ये विराटसोबत झालेल्या वादाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

आयपीएल २०२३ मध्ये लखनऊमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (आरसीबी) आणि लखनऊ सुपर जायंट्स (एलएसजी) यांच्यातील सामन्यादरम्यान नवीन आणि कोहली यांच्यात बाचाबाची झाली होती. या सामन्यात नवीन फलंदाजी करताना कोहलीशी भिडला होता. त्याचबरोबर सामना संपल्यानंतर कोहलीशी हस्तांदोलन करताना दोघात वाद झाला होता. विश्वचषकाच्या सामन्यात दोघेही आमनेसामने आले तेव्हा कोहलीने या खेळाडूला मिठी मारली.

आत्तापर्यंत आपल्या सगळ्यांना काय दिसत होतं ते माहीत होतं. आता अफगाणिस्तानच्या वेगवान गोलंदाजानेच याबाबतचे संपूर्ण सत्य सांगितले आहे. मैदानात दोन खेळाडूंमध्ये काय घडले ते त्याने सांगितले आहे. एवढेच नाही तर विराट कोहली चांगला माणूस असल्याचेही त्याने सांगितले. एकंदरीत तो म्हणाला की जे झाले ते झाले, पण लोकांनी प्रोत्साहन दिले. अशा गोष्टी होतात आणि मैदानाबाहेर निघून जातात. पण हा संपूर्ण वाद बघितला तर असे नाही. मैदानावरील वादानंतरही सोशल मीडियावर दोघांमध्ये शब्दांची देवाणघेवाण पाहायला मिळाली होती.

हेही वाचा – IND vs AFG: अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर सचिन तेंडुलकरकडून बुमराह-रोहितचे कौतुक; म्हणाला, ‘दोन सामन्यामध्ये…’

लोकांनी आणि माध्यमांनी ते मोठे केले –

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यानंतर नवीन उल हक म्हणाला, “माझ्या आणि कोहलीमध्ये जे काही घडले, ते मैदानात होते. मैदानाबाहेर आमच्यात वाद नव्हता. लोकांनी आणि माध्यमांनी ते मोठे केले. त्यांना त्यांचे फॉलोअर्स वाढवण्यासाठी अशा प्रकरणांची गरज असते.” याबरोबरच तो म्हणाला की कोहलीने त्याला भूतकाळ मागे सोडण्यास सांगितले.

हेही वाचा – IND vs AFG: विराट-नवीनच्या मैत्रीवर गौतम गंभीरने दिली महत्त्वाची प्रतिक्रिया; म्हणाला, ‘चाहत्यांना आवाहन करतो की…’

कोहली आणि नवीनने मिठी मारल्यानंतर डिवचने थांबले –

नवीन म्हणाला, “कोहलीने मला सांगितले की आपण त्या गोष्टी सोडल्या पाहिजेत. मीही त्याला उत्तर दिले, होय, या गोष्टी संपल्या आहेत.” जेव्हा नवीन विश्वचषकाच्या सामन्यात फलंदाजीसाठी आला तेव्हा प्रेक्षकांनी कोहली-कोहलीचा जयघोष सुरू केला. नवीन गोलंदाजी करतानाही हाच गोंधळ दिसला. कोहली आणि नवीनने एकमेकांना मिठी मारल्यानंतर प्रेक्षकांनी डिवचने थांबवले.