India vs Zimbabwe T20 Series Schedule Announced : भारतीय संघ आठ वर्षांनंतर टी-२० मालिका खेळण्यासाठी झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया या जुलैमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. २०१६ नंतर भारत टी-20 मालिकेसाठी झिम्बाब्वेचा दौरा करण्याची ही पहिलीच वेळ असेल. झिम्बाब्वे क्रिकेट आणि बीसीसीआयने मंगळवारी ही घोषणा केली. ६ जुलैपासून टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे. शेवटचा सामना १४ जुलै रोजी होणार आहे.

झिम्बाब्वे दौऱ्यात भारतीय संघ आपले सर्व सामने हरारे येथेच खेळणार आहे. १ ते २९ जून दरम्यान होणाऱ्या टी-२० विश्वचषकानंतर ही मालिका आयोजित केली जाईल. झिम्बाब्वे क्रिकेटच्या निवेदनात म्हटले आहे की, या मालिकेचा प्राथमिक उद्देश द्विपक्षीय संबंध मजबूत करणे आणि दोन्ही क्रिकेट मंडळांमधील सहकार्याची भावना वाढवणे आहे.

riyan parag
वेदनाशामक औषधे घेऊन रियान परागची निर्णायक खेळी!
Rishabh becomes first player to play 100th match for Delhi
IPL 2024 : ऋषभ पंतने झळकावले अनोखे ‘शतक’, दिल्ली कॅपिटल्ससाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला खेळाडू
Virat Reveals Time Spent With Family
IPL 2024 : ‘लोक आम्हाला ओळखत नव्हते’, विराट कोहली दोन महिने कुठे होता? स्वत:च उघड केले गुपित
Sunil Chhetri
भारताचे विजयाचे लक्ष्य! अफगाणिस्तानविरुद्ध ‘फिफा’ विश्वचषक पात्रता सामना आज; छेत्रीकडून अपेक्षा

तवेंगवा मुकुहलानी यांनी बीसीसीआयचे मानले आभार –

या मालिकेबद्दल आनंद व्यक्त करताना, झिम्बाब्वे क्रिकेटचे अध्यक्ष तवेंगवा मुकुहलानी म्हणाले, “जुलैमध्ये होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी भारताचे यजमानपद भूषवण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. या वर्षी आमचे सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय आकर्षण घरच्या मैदानावर असेल. भारताचा प्रभाव आणि खेळाप्रती असलेल्या समर्पणाचा क्रिकेट खेळाला नेहमीच खूप फायदा झाला आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा झिम्बाब्वे दौऱ्यासाठी वचनबद्ध झाल्याबद्दल बीसीसीआयचे खूप आभार मानू इच्छितो.”

हेही वाचा – U19 WC 2024 Semi Final : दक्षिण आफ्रिकेचं भारतासमोर २४५ धावांचं आव्हान, प्रिटोरियस-सेलेट्सवेनची अर्धशतकं

झिम्बाब्वेने भारताचे यजमानपद भूषवण्याची ही चौथी वेळ –

बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले, “बीसीसीआयने जागतिक क्रिकेट समुदायाला योगदान देण्यात नेहमीच आघाडीची भूमिका बजावली आहे. आम्हाला समजते की हा झिम्बाब्वेच्या पुनर्बांधणीचा काळ आहे आणि झिम्बाब्वे क्रिकेटला यावेळी आमच्या पाठिंब्याची गरज आहे.” द्विपक्षीय टी-२० मालिकेत झिम्बाब्वेने भारताचे यजमानपद भूषवण्याची ही चौथी वेळ असेल. यापूर्वी ही मालिका २०१०, २०१५ आणि २०१६ मध्ये टी-२० मालिका खेळवण्यात आली होती. भारताने २०१० आणि २०१६ मध्ये विजय मिळवला होता. त्याच वेळी, २०१५ मध्ये मालिका बरोबरीत राहिली.

हेही वाचा – SAT20 : धक्कादायक! बंदुकीचा धाक दाखवत स्टार क्रिकेटपटूला लुटले, दक्षिण आफ्रिकेतील घटना

भारत विरुद्ध झिम्बाब्वेने टी-२० मालिका २०२४ –

पहिला सामना- ६ जुलै (हरारे)
दुसरा सामना- ७ जुलै (हरारे)
तिसरा सामना- १० जुलै (हरारे)
चौथा सामना- १३ जुलै (हरारे)
पाचवा सामना- १४ जुलै (हरारे)