Harsha Bhogle on Pakistani cricket fan: भारतीय समालोचक हर्षा भोगले यांनी सोशल मीडियावर चोख प्रत्युत्तर देत भारतीय संघाला ट्रोल करणाऱ्या पाकिस्तानी क्रिकेट चाहत्याची बोलती बंद केली आहे. त्यांचे हे ट्वीट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. भोगले यांनी चाहत्याला थोडा मोठा विचार करायला शिकवले आणि यातूनच तुम्हाला चांगले जग दिसू शकते, असे सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अलीकडेच एका पाकिस्तानी चाहत्याने इन्स्टाग्रामवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्याची क्लिप ट्वीट केली आहे. ज्यामध्ये कॅप्शन लिहिले होते की, “जर तुमचा दिवस खराब होत असेल तर ऑस्ट्रेलियाकडून भारतीय संघाच्या अपमानाचा आनंद घ्या.” ही त्याच अ‍ॅडलेड कसोटी सामन्याची क्लिप आहे ज्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध फलंदाजी करताना भारत ३६ धावांवर सर्वबाद झाला होता. या सामन्यात वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड आणि पॅट कमिन्स यांनी संपूर्ण भारतीय संघ बाद केला होता.

या ट्वीटला प्रत्युत्तर देताना हर्षा भोगले यांनी लिहिले, “मला आनंद आहे की फारूक तू हे समोर आणलेस कारण, यानंतर भारताने याच कसोटीतीत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. उत्तम धैर्य, उत्कृष्ट नेतृत्व आणि आत्मविश्‍वास याद्वारे तुम्ही प्रतिकूल परिस्थितीचा कसा सामना आणि त्यावर कशी मात करता हे दाखवून दिले. मला वाटते की, यानंतर टीम इंडियाने ३-१अशी मालिका जिंकली होती. विजेत्या मालिकांमध्ये जर केस स्टडी करायचा असेल तर या मालिकाचा करता येईल.”

हर्षा भोगले त्या चाहत्याला अडवत म्हणाले, “जेव्हा तुम्हाला दुसऱ्याच्या संकटात आनंद मिळतो तेव्हा तुम्ही त्यांच्यासमोर खुजे आणि तुच्छ वाटतात. त्यामुळे काहीतरी मोठा विचार करा. तुम्ही थोडासा व्यापक विचार म्हणजे एक चांगले जग सापडेल. जेव्हा तुम्हाला तो अभिमान असतो, तेव्हा तुम्ही नवीन उंची गाठता. असाधारण कामगिरी करणारा खेळाडू कसा खेळतो हे मला या मालिकेत पाहायचे आहे. आशा आहे…”

हेही वाचा: IND vs SA: दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी द्रविडने सांगितला टीम इंडियाचा गेम प्लॅन; “आम्ही उसळत्या चेंडूच्या खेळपट्टीवर…”

या सामन्याबद्दल जर बोलायचे झाले तर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाने अ‍ॅडलेडमध्ये पहिल्या डावात २४४ धावा केल्या होत्या, ज्यामध्ये कोहलीने ७४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने १९१ धावा केल्या. पण दुसऱ्या डावात भारत ३६ धावांवर सर्वबाद झाला. ज्यामध्ये एकाही भारतीय फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. ऑस्ट्रेलियाने कसोटी सामना आठ विकेट्सने जिंकला. मात्र, भारताने ४ सामन्यांची कसोटी मालिका ३-१ने जिंकली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Think something big harsha bhogle gave a befitting reply to pakistani fan for trolling the indian team avw
First published on: 07-12-2023 at 16:13 IST