KL Rahul getting angry at an employee from a big script : आयपीएल २०२४ च्या पर्वाला सुरुवात होण्यासाठी एक महिन्याहून कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. २२ फेब्रुवारी रोजी बीसीसीआयने आयपीएलच्या १७ व्या हंगामाचे संपूर्ण वेळापत्रकही जाहीर केले आहे. पण या तयारीदरम्यानचे काही भारतीय खेळाडूंचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रथम, हार्दिक पंड्याचा आयपीएल शूटवरील व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो त्याच्या आहाराबद्दल नाराजी व्यक्त करताना दिसत होता. त्याचवेळी आता स्टार फलंदाज केएल राहुलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये राहुल स्क्रिप्टवर रागावलेला दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केएल राहुल संतापल्याचा व्हिडीओ व्हायरल –

आयपीएल शूटमधील मोठी स्क्रिप्ट पाहून केएल राहुल कर्मचाऱ्यावर रागावल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये राहुल म्हणाला, “हे सगळं कसं पाठ करणार भावा? जर मला पाठांतर करता येत असते, तर मी माझा अभ्यास थोडा गंभीरपणे केला असता. हे सर्व मजाक आहे का? मॅच डे प्रोमो इंग्रजी, मॅच डे प्रोमो हिंदी, मॅच डे प्रोमो कन्नड.”

केएल राहुल पुढे म्हणाला, “मी सांभाळून घेतोय म्हणून तुम्ही काहीही करू घेणार का? मी तीन वेळा एकच सांगतोय, लोकं कंटाळतील, त्यांना हे सगळं बघायचं नाही. कसले प्रश्न आहेत, हे सर्व कोण लिहित आहे? स्टार स्पोर्ट्सचा हा टॉक शो चालू नसून आयपीएल आहे. दिग्दर्शक कोण आहे, हे कोणी लिहिले आहे?” राहुलच्या रागावल्यानंतर कर्मचारी म्हणाला, ‘साहेब, तुम्ही हे विसरा, आम्ही तुम्हाला दुसरी स्क्रिप्ट देऊ.’ राहुल शेवटी म्हणाला, ‘वेळ वाया घालवला.’

हार्दिक पंड्याही झाला होता नाराज –

राहुलच्या आधी हार्दिक पंड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये तो त्याच्या डाएटबद्दल नाराज दिसत होता. तो म्हणाला होता, “हे काय आहे भावा, मी जिलेबी कशी खाऊ. हा काय ढोकळा, भावा मला फिटनेस सांभाळायचा असतो. मी हे कसे करणार, हे कोणी पाठवले आहे? माझा शेफ कुठे आहे, भावा मी कसे मॅनेज सांभाळणार? हे काय आहे? दिग्दर्शक साहेबांना सांगा, हे चालणार नाही. माझा स्टॅमिना बिघडेल.”

हेही वाचा – Sachin Tendulkar : खांद्यापासून हात नसलेल्या फलंदाजाला सचिनकडून खास भेट; अखेर ‘तो’ शब्द पाळला

आयपीएल २०२४ चे वेळापत्रक जाहीर –

आयपीएल २०२४ चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले नसून पहिल्या २१ सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यंदाच्या हंगामातील पहिला सामना गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात २२ मार्च रोजी होणार आहे. गेल्या मोसमात सीएसकेने अंतिम सामन्यात गुजरातविरुद्ध रोमहर्षक विजय नोंदवला होता. आयपीएलच्या इतिहासात चेन्नईने एकूण ५ वेळा विजेतेपद पटकावले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video of kl rahul getting angry at an employee from a big script in ipl 2024 shoot goes viral vbm