भारतीय कर्णधार विराट कोहली हा अतिशय आक्रमक खेळाडू आहे. मैदानात खेळतानादेखील तो अतिशय आक्रमतेने वागतो. अनेकदा त्याच्या आक्रमतेमुळे प्रतिस्पर्धा संघाच्या खेळाडूंशी त्याची बाचाबाचीदेखील होते. असे असतानाही दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डीव्हिलियर्स याने विराटची तुलना अत्यंत शांत आणि संयमी अशा स्टार टेनिसपटू रॉजर फेडररशी केली आहे.

VIDEO : आजच्याच दिवशी ‘मुंबई इंडियन्स’ने मारला होता विजेतेपजदाचा चौकार

विराट-डीव्हिलियर्स दोघे गेली नऊ वर्षे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघातून खेळत आहेत. ते एकमेकांना चांगलेच ओळखतात. याच मुद्द्यांच्या आधारे डीव्हिलियर्सने विराट म्हणजे क्रिकेटचा रॉजर फेडरर असल्याचे म्हटले आहे. समालोचक पॉमी बांग्वा याच्याशी इन्स्टाग्राम लाईव्ह वरून संवाद साधताना तो बोलत होता.

“क्रिकेटमधला सर्वात वाईट निर्णय घेणारा कर्णधार”

“विराट फलंदाजी करत असताना त्याची फटकेबाजी अत्यंत नैसर्गिक असल्यासारखी वाटते. तो या बाबतीत टेनिसपटू रॉजर फेडररसारखा आहे. याउलट स्टीव्ह स्मिथ मात्र राफेल नदालसारखा आहे. तो मानसिकदृष्ट्या खूप भक्कम आहे. स्मिथ धावा जमवण्याचं तंत्र शोधून काढतो, पण त्याची फटकेबाजी तितकीशी सहज आणि नैसर्गिक वाटत नाही. स्मिथने अनेक विक्रम मोडले असले, तरी विराटने सर्वत्र जाऊन दमदार खेळ करून दाखवला आहे, त्यामुळे मला विराटची खेळी अधिक आवडते”, असे डीव्हिलियर्स म्हणाला.

‘या’ बाबतीत सचिनपेक्षा विराट सरस

“सचिन तेंडुलकर हा आम्हा दोघांचा आदर्श आहे. सचिन त्याच्या काळात ज्याप्रकारे खेळला आणि त्याने ज्याप्रकारे विविध विक्रम मोडीत काढले ती बाब वाखाणण्याजोगी आहे. त्याने युवा पिढीसाठी एक उत्तम उदाहरण ठेवले. विराटदेखील ही गोष्ट मान्य करेल. विराटपण हेच म्हणेल की सचिन एक सर्वोत्तम खेळाडू होता. पण वैयक्तिकरित्या मला असं वाटतं की जेव्हा आव्हानांचा पाठलाग करण्याची वेळ येते, तेव्हा विराट हा सचिनपेक्षा उत्कृष्ट आहे”, असे मत डिव्हिलियर्सने व्यक्ते केले.

“रन मिळाली नाही की विराट गोलंदाजाला घाणेरड्या शिव्या देतो”

“सर्वच प्रकारच्या क्रिकेट प्रकारात सचिनने उत्तम कामगिरी केली आहे. कोणाचेही यात दुमत असूच शकत नाही. पण आव्हानाचा पाठलाग करताना जेव्हा दडपणाची स्थिती असते, त्यावेळी विराट सचिनपेक्षा सरस आहे असं मला वाटतं. विराट जर फलंदाजी करत असेल, तर कितीही धावसंख्या कमीच आहे”, असे डीव्हिलियर्स म्हणाला.