Virat Kohli requested his friends not to ask for tickets: आयसीसी विश्वचषक २०२३ च्या स्पर्धेला ५ ऑक्टोबरपासून भारतात सुरुवात होणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत विजेतेपदाचा प्रबळ दावेदार टीम इंडियाला मानले जात आहे. दरम्यान अशात सर्वांच्या नजर टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या कामगिरीवर असणार आहे. आता विश्वचषक स्पर्धा सुरु होण्यास एक दिवस शिल्लक असताना विराट कोहलीने एक पोस्ट शेअर केली आहे, ज्याची सर्वत्र चर्चा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकदिवसीय विश्वचषक २०२३ सुरू होण्याच्या एक दिवस आधी, भारताचा क्रिकेटर विराट कोहलीने त्याच्या मित्रांना एक विनंती केली आहे. हा कदाचित विनम्र संदेश नसावा, परंतु कोहलीने त्याच्या मित्रांना एकदिवसीय विश्वचषकाची तिकिटे मागू नयेत, असे स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर त्यांना त्यांच्या स्वतःच्या घरातून सामन्यांचा आनंद घेण्याचे आवाहन केले.

विराट कोहलीची इन्स्टाग्राम स्टोरी

विराट कोहलीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट करत लिहिले की, “आम्ही विश्वचषकाकडे वाटचाल करत असताना, मी माझ्या मित्रांना नम्रपणे सांगू इच्छितो की संपूर्ण स्पर्धेदरम्यान मला तिकिटांसाठी कॉल करू नका. कृपया तुमच्या घरूनच सामन्यांचा आनंद घ्या.”
मागील विश्वचषकातील अनेक माजी क्रिकेटपटूंनी सांगितले होते की, त्यांना मोठ्या स्पर्धांपूर्वी किंवा दरम्यान मित्र आणि कुटुंबातील सदस्यांकडून तिकिटांसाठी विनंत्या केल्या होत्या. दरम्यान, वैयक्तिक कारणास्तव मुंबईला उड्डाण केल्यानंतर कोहली मंगळवारी तिरुवनंतपुरम (केरळ) येथे आपल्या भारतीय सहकाऱ्यांसोबत सामील होणार आहे.

हेही वाचा – World Cup 2023: विश्वचषक स्पर्धेला फक्त एक दिवस बाकी, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार सामन्यांचे लाइव्ह स्ट्रिमिंग?

भारतात विश्वचषक सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग कोठे उपलब्ध असेल?

तुम्ही डिज्नी प्लस हॉटस्टार अॅपवर विश्वचषक सामने ऑनलाइन पाहू शकता. तुम्हाला मोबाईलवर सामना मोफत पाहता येणार आहे. लॅपटॉप किंवा स्मार्ट टीव्हीवर पाहण्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतील आणि सदस्यता घ्यावी लागेल.

विश्वचषकासाठी भारतीय संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, केएल राहुल, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन आश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli requested his friends not to ask for tickets in icc odi world cup 2023 matches vbm