Wanindu Hasaranga has been banned for Two T20I matches by ICC : श्रीलंकेचा कर्णधार वानिंदू हसरंगा याला आयसीसीने दोन सामन्यांसाठी निलंबित केले आहे. याशिवाय त्याला मॅच फीच्या ५० टक्के दंडही ठोठावण्यात आला आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेतील शेवटच्या टी-२० सामन्यात हसरंगाने पंचांच्या निर्णयाला विरोध केला होता, त्यामुळे आयसीसीने त्याच्यावर कारवाई केली आहे. पुढील महिन्यात बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये हसरंगाला श्रीलंका संघाचे प्रतिनिधित्व करता येणार नाही.

नक्की काय घडलं?

अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील शेवटचा टी-२० सामना निर्णायक वळणावर होता. श्रीलंकेला विजयासाठी ३ चेंडूत ११ धावांची गरज होती. त्यावेळी वफादार मोमंदने उंच फुलटॉस चेंडू टाकला. यावर अंपायर हॅनिबलने नो बॉलचा इशारा दिला नाही. त्यावेळी श्रीलंकेसाठी कमिंडू मेंडिस फलंदाजी करत होता. हा चेंडून कामिंदू सरळ उभा असला असता, तरी चेंडू त्याच्या कमरेच्यावरून गेला असता, तरीही अंपायरने त्याला नो बॉल म्हटले नाही.

Rohit Sharma Unwanted Record In IPL 2024
MI vs CSK : रोहित शर्माच्या नावावर झाली नकोशा विक्रमाची नोंद, ‘या’ बाबतीत ठरला तिसरा खेळाडू
Shikhar Dhawan's Shoulder Injury Updates in Marathi
Punjab Kings : राजस्थानविरुद्धच्या पराभवानंतर पंजाबला दुसरा धक्का, शिखर धवन पुढील काही सामन्यांना मुकणार
Mohammad Amir and Imad Wasim Returns to Pakistan National Team
फिक्सिंग, बंदी आणि निवृत्तीनंतर मोहम्मद आमिर पुन्हा पाकिस्तानच्या टी-२० संघात
Mohit Sharma on Ravi Shastri's Comment
GT vs SRH : वयांवरुन खिल्ली उडवणाऱ्या रवी शास्त्रींना मोहित शर्माचे चोख प्रत्युत्तर; म्हणाला, ‘माझं वय वाढतंय…’

पंचांच्या या निर्णयावर कर्णधार वानिंदू हसरंगाला प्रचंड राग आला आणि त्याने निषेध केला. त्याच्या मते, आंतरराष्ट्रीय सामन्यात असे होऊ नये आणि त्याने मैदानात येऊन पंचाशी वाद घातला. त्यामुळे आयसीसीने त्याच्यावर दोन सामन्यांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला.या सामन्यात श्रीलंकेला ३ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

हेही वाचा – IND vs ENG 4th Test : भारताचा पहिला डाव ३०७ धावांवर आटोपला, ध्रुव जुरेलचे हुकले शतक, इंग्लंड ४६ धावांनी आघाडीवर

काय म्हणाला वानिंदू हसरंगा?

अंपायरच्या निर्णयाबाबत हसरंगा म्हणाला होता, “आंतरराष्ट्रीय सामन्यात अशा गोष्टी घडू नयेत. जर चेंडू कमरेच्या उंचीच्या जवळ असता, तर कोणतीही अडचण येणार नव्हती. पण एवढा उंच जाणारा चेंडू जर थोडा आणखी वर गेला असता, तर तो फलंदाजाच्या डोक्याला लागला असता. जर तुम्हाला ते दिसत नसेल, तर तो अंपायर आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी योग्य नाही. त्यामुळे ते अंपायरिंग ऐवजी दुसरे काही काम करत असते तर बरे झाले असते.”

हेही वाचा – Babar Azam : प्रेक्षकांच्या ‘झिम्बाबर-झिम्बाबर’च्या घोषणांनी बाबर संतापला, बाटली फेकून मारण्याचा दिला इशारा, पाहा VIDEO

आयसीसीने हसरंगावर केली कारवाई –

आयसीसीने हसरंगावर कारवाई करताना आपल्या निवेदनात म्हटलेआहे की, ‘हसरंगा खेळाडूंना समर्थन देण्यासाठी आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम २.१३ चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळला आहे. हे आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान खेळाडू, खेळाडू समर्थन कर्मचारी, पंच किंवा सामनाधिकारी यांच्या वैयक्तिक गैरवर्तनाशी संबंधित आहे. त्याला एका कसोटी सामन्यासाठी किंवा दोन एकदिवसीय सामन्यांसाठी किंवा टी-२० सामन्यांसाठी (जे आधी असेल) बंदी घालण्यात येईल.