India vs England, 4th Test Updates : रांची येथे भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारताचा पहिला डाव तिसऱ्या दिवशी ३०७ धावांवर आटोपला. इंग्लंडने पहिल्या डावात ३५३ धावा केल्या होत्या. अशा स्थितीत इंग्लंड दुसऱ्या डावात ४६ धावांच्या आघाडी घेतली. मात्र, युवा ध्रुव जुरेलने तळातील फलंदाजांसह भारताचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचे अवघ्या १० धावांनी शतक हुकले. इंग्लंडकडून शोएब बशीरने सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या.

ध्रुव जुरेलचे शतक हुकले –

भारताकडून ध्रुव जुरेलने सर्वाधिक ९० धावा केल्या. त्याचे शतक हुकले आणि दहाव्या विकेटच्या रुपाने तो बाद झाला. त्याला टॉम हार्टलेने क्लीन बोल्ड केले. त्याने १४९ चेंडूचा सामना करताना ६ चौकार ४ षटकारांच्या मदतीने ९० धावांची खेळी साकारली. या खेळीनंतर मैदानावर उपस्थित प्रेक्षकांनी आणि ड्रेसिंग रूममध्ये उपस्थित भारतीय खेळाडूंनी जुरेलचे टाळ्या वाजवून स्वागत केले.

Rohit Sharma Unwanted Record In IPL 2024
MI vs CSK : रोहित शर्माच्या नावावर झाली नकोशा विक्रमाची नोंद, ‘या’ बाबतीत ठरला तिसरा खेळाडू
IPL 2024 Gujarat Titans vs Punjab Kings Match Updates in Marathi
IPL 2024: शुबमन गिलच्या नावे आयपीएलमध्ये अजून एक मोठा रेकॉर्ड; रोहित, विराट, रहाणे सर्वांनाच टाकलं मागे
Delhi Capitals vs Chennai Super Kings IPL 2024 Live Score in Marathi
IPL 2024 DC vs CSK Highlights : दिल्ली कॅपिटल्सने उघडले विजयाचे खाते, चेन्नई सुपर किंग्जच्या विजयी रथाला लागला ब्रेक
IPL 2024 SRH vs MI Match Updates in marathi
IPL 2024 : हार्दिकच्या मुंबईचा सनरायझर्सकडून पालापाचोळा, नोंदवली आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या!

जुरेलची कुलदीपसह ७६ धावांची भागीदारी –

आज भारताने सात विकेट्सवर २१९ धावांवरून खेळण्यास सुरुवात केली आणि ८८ धावा करताना उर्वरित तीन विकेट गमावल्या. आज भारताला पहिला धक्का कुलदीप यादवच्या रूपाने बसला. कुलदीप २८ धावा करून बाद झाला. त्याने जुरेलसोबत ७६ धावांची भागीदारी केली. यानंतर आकाश दीप फलंदाजीला आला आणि त्याने जुरेलसोबत ४० धावांची भागीदारी केली. नऊ धावा करून आकाश बाद झाला. शोएब बशीरने या दोघांनाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले आणि आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत पहिल्यांदाच पाच बळी मिळवण्याची किमया साधली.

हेही वाचा – VIDEO : ‘हे कोण लिहितंय…’, आयपीएल शूटमध्ये केएल राहुलचा संयम सुटला, स्क्रिप्टवरुन कर्मचाऱ्यावर संतापला

गिलची यशस्वीसह ८२ धावांची भागीदारी –

तत्पूर्वी दुसऱ्या दिवशी कर्णधार रोहित शर्मा दोन धावा करून बाद झाला होती. यानंतर शुबमन गिलने यशस्वी जैस्वालसोबत ८२ धावांची भागीदारी केली. रजत पाटीदार पुन्हा एकदा अपयशी ठरला आणि केवळ १७ धावा करू शकला. रवींद्र जडेजा १२ धावा करून बाद झाला. रोहितला अँडरसनने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तर शुबमन, रजत आणि जडेजा यांना शोएब बशीरने पॅव्हेलियनमध्ये पाठवले.दरम्यान, यशस्वीने कसोटी कारकिर्दीतील तिसरे अर्धशतक झळकावले. मात्र, ७३ धावा करून तो बशीरचा बळी ठरला.

हेही वाचा – रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा: कर्नाटकविरुद्ध विदर्भ भक्कम स्थितीत

शोएब बशीरने घेतल्या सर्वाधिक ५ विकेट्स –

सर्फराझ खानही अपयशी ठरला, तो १४ धावा करून बाद झाला. तसेच अश्विन १ धाव करून बाद झाला. या दोघांना हार्टलेने बाद केले. इंग्लंडकडून बशीरने पाच आणि हार्टलेने तीन बळी घेतले. तर जेम्स अँडरसनला दोन विकेट मिळाल्या.