scorecardresearch

Premium

दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यासह विंडीजचे मालिकेवर प्रभुत्व

मधली फळी ढासळल्यावरही खंबीरपणे लढा देत वेस्ट इंडिजने बार्बाडोसमधील दुसरा ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय सामना जिंकला आणि इंग्लंडविरुद्धच्या तीन

दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यासह विंडीजचे मालिकेवर प्रभुत्व

मधली फळी ढासळल्यावरही खंबीरपणे लढा देत वेस्ट इंडिजने बार्बाडोसमधील दुसरा ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय सामना जिंकला आणि इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेवर २-० असे विजयी प्रभुत्व प्रस्थापित केले. जॉस बटलरच्या ६७ धावांच्या खेळीच्या बळावर प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडने ७ बाद १५२ धावा केल्या. फिरकी गोलंदाज सुनील नरिनला दुखापत झाल्यामुळे डावखुरा फिरकी गोलंदाज क्रिश्मर सॅन्टोकीला संधी मिळाली. त्याने या संधीचे सोने करताना २१ धावांत ४ बळी घेतले आणि सामनावीर किताब पटकावला. १५व्या षटकात २ बाद १११ अशा सुस्थितीत असलेल्या वेस्ट इंडिजचे तीन फलंदाज फक्त पाच धावांच्या मोबदल्यात बाद झाले. परंतु कर्णधार डॅरेन सॅमीने फक्त ९ चेंडूंत २ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ३० धावा काढत संघाला ७ चेंडू राखून विजय मिळवून दिला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: West indies won 2nd t20 cricket match by 5 wkts

First published on: 13-03-2014 at 12:12 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×