Zimbabwe Cricket Board suspends two players : झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने आपल्या दोन खेळाडूंवर मोठी कारवाई केली आहे. या दोन्ही खेळाडूंनी अशा औषधांचे सेवन केले होते ज्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतर हे दोन्ही खेळाडू डोप टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळले. झिम्बाब्वेच्या या दोन खेळाडूंची नावे वेस्ली माधवेरे आणि ब्रँडन मावुता अशी आहेत. ज्यांच्या विरोधात झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने कारवाई केली आहे.

क्रिकेट बोर्डाने आता या दोन्ही खेळाडूंना पुढील सुनावणीपर्यंत निलंबित केले आहे. दोन्ही खेळाडू डोपिंगविरोधी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळले. त्यानंतर झिम्बाब्वे क्रिकेटने दोन्ही खेळाडूंवर तत्काळ कारवाई केली.

Virat Kohli
T20 World Cup : विराट कोहली सराव सामन्याला मुकणार; कारण आले समोर, IPL नंतर…
BCCI Secretary Jai Shah clarification regarding the coaching position that he has no contact with former Australian players
ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूंशी संपर्क नाही; प्रशिक्षकपदाबाबत ‘बीसीसीआय’ सचिव जय शहा यांचे स्पष्टीकरण
Kagiso Rabada Injury is Biggest Tension for South Africa Cricket Board
वर्ल्डकप जिंकण्यापेक्षा दक्षिण आफ्रिकेला चिंता भेडसावतेय कोटा सिस्टमची, रबाडाची दुखापत ठरलंय निमित्त
bajarang puniya
जागतिक कुस्ती संघटनेकडून बजरंग निलंबित; उत्तेजक चाचणीस नकार दिल्यामुळे ‘यूडब्ल्यूडब्ल्यू’कडून कारवाई
rohit needs rest due to exhaustion from playing cricket continuously opinion of michael clarke
रोहितला विश्रांतीची गरज! सातत्याने क्रिकेट खेळून दमल्याने फलंदाजीवर परिणाम; मायकल क्लार्कचे मत
Hardik Pandya Shouted on Jasprit Bumrah Video
IPL 2024: हार्दिक पंड्या भर मैदानात बुमराहवर ओरडला, निराश झालेल्या जसप्रीतने दिली अशी प्रतिक्रिया; Video व्हायरल
MSK Prasad Statement on Hardik Pandya
सध्या देशात हार्दिकपेक्षा चांगला वेगवान गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू कोणी आहे? – BCCI चे माजी निवडकर्ता एमएसके प्रसाद
Madan Lal's reaction to Indian fast bowlers
T20 World Cup 2024 : “भारताचे वेगवान गोलंदाजी आक्रमण कमकुवत…”, माजी विश्वविजेत्या खेळाडूचं मोठं वक्तव्य

झिम्बाब्वे क्रिकेटने एक निवेदन जारी केले –

झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने एक निवेदन जारी करून याबाबत माहिती दिली. झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने आपल्या निवेदनात असे म्हटले आहे की, ‘दोन्ही खेळाडू बंदी घातलेल्या औषधांचे सेवन केल्याप्रकरणी दोषी आढळले आहेत. वेस्ली माधवेरे आणि ब्रँडन मावुता यांची डोप चाचणी पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर या दोन्ही खेळाडूंना प्रकरणाची पूर्ण सुनावणी होईपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. आता पुढील आदेश येईपर्यंत हे खेळाडू कोणत्याही क्रिकेट उपक्रमात सहभागी होऊ शकणार नाहीत.

हेही वाचा – IND vs SA : तिसर्‍या वनडे सामन्यातून ऋतुराज गायकवाडला का वगळलं? बीसीसीआयने सांगितले कारण

दोन्ही खेळाडूंनी झिम्बाब्वेसाठी आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत –

या दोन्ही खेळाडूंनी झिम्बाब्वे राष्ट्रीय संघासाठी भरपूर क्रिकेट खेळले आहे. वेस्ली माधवेरेने झिम्बाब्वेसाठी ९८ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यापैकी ३६ एकदिवसीय आणि ६० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने आहेत. माधवेरेने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ७०५ आणि टी-२०मध्ये १०४७ धावा केल्या आहेत. दुसरीकडे, ब्रेंडन मावुता झिम्बाब्वेसाठी ४ कसोटी, १२ एकदिवसीय आणि १० टी-20 सामने खेळला आहे. मावुताने कसोटीत ८२ धावा, वनडेत ८८ धावा आणि ६१ धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर फक्त एक अर्धशतक आहे.

हेही वाचा – IND vs SA 3rd ODI : सॅमसन दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा भारतीय, विराटच्या विक्रमाशी केली बरोबरी

झिम्बाब्वे संघाचा वाईट काळ सुरू आहे –

झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा सध्या वाईट काळ सुरू आहे. झिम्बाब्वेचा संघ २०२४ च्या टी-२० विश्वचषकासाठीही पात्र ठरू शकलेला नाही. आता झिम्बाब्वे संघ २०२४ मध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकात खेळताना दिसणार नाही. गेल्या वर्षी या संघाने टी-२० विश्वचषकात चांगली कामगिरी केली होती. या संघाने या स्पर्धेत पाकिस्तानसारख्या संघाचाही पराभव केला होता.