‘फूड स्टीमर’ हे स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचे उपकरण आहे. अन्नपदार्थ शिजवण्यासाठी याचा उपयोग होत असून उपकरण वेळोवेळी स्वच्छ ठेवणेही गरजेचे आहे. हे उपकरण जर पूर्णपणे साफ झाले नाही आणि पदार्थाचे डाग जर राहिले तर पुन्हा अन्नपदार्थ शिजवताना त्याच्या चवीमध्ये परिणाम होण्याची शक्यता आहे.

*      फूड स्टीमरचा वापर झाल्यानंतर तो पूर्णपणे रिकामा करा. त्यात अन्नपदार्थ राहिले तर ते सडून फूड स्टीमरमध्ये उग्र वास येतो. त्यामुळे फूड स्टीमर पूर्णपणे रिकामा करून साफ करा.

*      फूड स्टीमरचा वापर झाल्यानंतर विद्युतपुरवठा बंद करा. फूड स्टीमर पूर्णपणे थंड झाल्यानंतरच त्याची साफसफाई करा.

*      फूड स्टीमरची साफसफाई करताना कोमट पाणी, डिटर्जण्ट किंवा भांडी घासण्याच्या साबणाचा वापर करू शकता.

*      फूड स्टीमरची साफसफाई करताना त्याचे सुटे भाग वेगळे करा. झाकण, कंटेनर आणि ड्रिप ट्रे वेगळे करून त्यांची सफाई करा.

*      सफाईनंतर सुक्या फडक्याने स्टीमर पुसून घ्या. पूर्णपणे सुकल्यानंतरच त्याचा पुर्नवापर करा.