News Flash

‘मेम्स’ करू या,  थोडे ‘म्युझिकली’  होऊ या!

ज्यात मनोरंजनाच्या उद्देशाने स्वत:ला एका अर्थाने प्रसिद्धी मिळविण्यासाठी करण्यात येणारी क्लृप्ती म्हणता येईल.

(संग्रहित छायाचित्र)

शामल भंडारे

तंत्रज्ञानात सातत्याने होणारे बदल नवी पिढी क्षणात आपलेसे करते आणि समाजमाध्यमांवर जिथे-तिथे या बदलांचा उपयोग होताना दिसतो. बरं, याचा वापर केवळ एक हौस म्हणून नाही तर स्वत:ची वेगळी ओळख तयार करून करिअरच्या दृष्टीने काही काम मिळते का याकडे पाहण्याचा असतो. सध्या समाजमाध्यमांवर तरुणांच्या ‘मेम्स’ म्हणून प्रचलित गमतीशीर पोस्ट्स पाहायला मिळत आहेत, तर एकीकडे ‘म्युझिकली व्हिडीओज्’ तयार करून अंगीभूत असणाऱ्या गुणांना समाजमाध्यमांवर व्यासपीठ उपलब्ध करण्याचे काम तरुण करीत आहेत. नेमके हे ‘मेम्स’ कसे सुचतात, समाजमाध्यमांवर ते अपलोड का करावेसे वाटतात या अनुषंगाने तरुणांशी संवाद साधून घेतलेला आढावा..

नेमके आहे तरी काय हे मेम्स?

अलीकडे इन्स्टाग्राम, फेसबुक स्टोरीज म्हणून वेगवेगळ्या वस्तुस्थितीस अनुसरून आणि काहीशा अतिशयोक्तीने हे ‘मेम्स’ प्रसारित केले जातात. ज्यात मनोरंजनाच्या उद्देशाने स्वत:ला एका अर्थाने प्रसिद्धी मिळविण्यासाठी करण्यात येणारी क्लृप्ती म्हणता येईल. स्वत:ला अपडेट ठेवता यावे यासाठी तरुणांकडून मोठय़ा प्रमाणात अशा मेम्सला प्रसिद्धी मिळते. सध्या सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेणारा हा समाजमाध्यमांचा एक प्रकार आहे. एखादा प्रसिद्ध चित्रपट, वेब सीरिजमधील कलाकारांचे छायाचित्र घ्यायचे आणि त्या कलाकारांच्या भूमिकेत विनोदी संवाद तयार करायचे, अशी ही प्रक्रिया. सर्वाधिक उपयोगात येणारे सोशल मीडिया अ‍ॅप्स म्हणजे इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आहेत. यापैकी इन्स्टाग्राम हे मेम्स प्रसारित केले जाणारे सर्वाधिक लोकप्रिय अ‍ॅप आहे. एखादा सिनेमा प्रसिद्ध झाल्यावर हमखास मेम्स बनवले जातात. हल्लीच्या आधुनिक उपक्रमांचा वापर करून एखाद्यावर विनोदी उपरोधक टीका करणे म्हणजे ‘मेम्स’..

तरुण काय म्हणतात..

काही तरुणांना या मेम्सबद्दल विचारले असता त्यांनी यामागची त्यांच्या कल्पनेत असलेली पाश्र्वभूमी सांगितली. एकंदरीत सध्याच्या काळात आपल्या आजूबाजूला लक्ष वेधून घेणाऱ्या गोष्टींवर हे गमतीशीररीत्या बनवण्यात येतात. हे मेम्स कित्येकदा समाजमाध्यमांवरून कॉपी पेस्ट करण्यात येतात. स्टोरीज म्हणून वेगवेगळ्या अ‍ॅप्ससाठी वापरण्यात येतात. कित्येक मेम्सप्रेमी मंडळी तर स्वत: हे बनवण्यात माहीर असतात, शिवाय त्यांना यावर मोठय़ा प्रमाणात प्रतिसाददेखील मिळतो. बहुतांश वेळा राजकीय गोष्टींचा आणि घडामोडींचा यात समावेश नसतो. आजच्या तारखेला आपल्या भोवताली ज्या गोष्टींचा सर्वाधिक परिणाम आजच्या पिढीवर होत आहेत त्या गोष्टी ग्राह्य़ धरल्या जातात. काही लोक या गोष्टींमध्ये इतके अग्रेसर असतात, की त्यांची ओळख या मेम्सच्या विषयापासून निघते म्हणजेच त्यांना त्यांच्या मित्रपरिवारामध्ये मेम्सवरून ओळखण्यात येते.

वास्तवाशी थेट संपर्क

मेम्स हे वास्तववादी गोष्टींवरून टाकण्यात येतात ज्यावरून लोक स्वत:ला त्या भूमिकेत पाहतात. अर्थातच हा एक गमतीचा भाग असतो. मनोरंजन हा प्राथमिक भाग आहे. या स्टोरीज टाकण्यामागे मूळ उद्दिष्ट मनोरंजनच आहे. माझ्यासाठी या सर्व मेम्सचे माध्यम तरी फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप एवढा  आहे. काही रसिक लोक स्वत: असे  मेम्स बनवतात आणि पोस्ट करतात. विशेष  महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले फॉलोअर्स या स्टोरीज बघतात आणि रिप्लाय देखील देतात, याचाच अर्थ या सर्व गोष्टींचा प्रभाव पडत असतो. याचे वाईट आणि चांगले अशा दोन्ही प्रकारे लोकांवर प्रभाव पडतात.

– रितीका शिलकर

मनोरंजनाचा एक भाग

बहुतेकदा तरी मेम्स हे मजामस्ती यासाठी  पोस्ट करण्यात  येतात. लोकांचे लाइक्स मोठय़ा प्रमाणात मिळतात. या मेम्ससारख्या पोस्ट स्टोरीजवरच न टाकता मी काही पोस्ट या थेट माझ्या टाइमलाइनवरदेखील टाकत असतो. यात चांगला प्रतिसाद मिळतो. सामाजिक आणि राजकीय असे दोन्ही विषय समाविष्ट असतात. मात्र कधी कधी या मेम्सच्या माध्यमातून गोष्टींची  अतिशयोक्ती होते. मात्र काही वेळा हे मेम्स अयोग्यरीत्या हाताळले जाते. कित्येकदा भाषेचा गैरवापर करण्यात येतो. अयोग्य भाषा वापरण्यात येते. आपण सार्वजनिक माध्यमांवर असताना सामाजिक बांधिलकीचे भान राखणे गरजेचे आहे.

– हितेश कल्याणकर

‘म्युझिकली’मुळे लोकप्रियता

संवाद आणि संगीत यावर हा म्युझिकली अ‍ॅप आधारित आहे. एखादे विदेशी  संगीत असो किंवा देशी संगीत, अतिशय उत्कृष्ट नकला करून स्वत:चे फॉलोअर्स वाढवण्याचा हा उत्तम फंडा आहे. म्युझिकली व्हिडीओ करून स्वत:चे चाहते वाढवणारा राजन दुबे सांगतो, म्युझिकली व्हिडीओमुळे दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढत चालली आहे. समाज माध्यमांवरील त्याच्या फॉलोअर्सनी त्याच्या या व्हिडीओमुळे १४ ते १५ हजारापर्यंतचा टप्पा गाठलेला आहे. या व्हिडीओमुळे त्याला नवीन ओळख मिळाली आहे. ज्या तरुणांना व्यक्त होण्यासाठी आणि आपल्या कलागुणांना इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी माध्यम मिळत नाही तेव्हा अशा माध्यमांचा खूप मोठय़ा प्रमाणात हातभार लागतो. कला क्षेत्रातील काही नामांकित व्यक्तींकडूनही अशा तरुणांची दखल घेतली जाते. मला या म्युझिकली व्हिडीओमुळे एका नामांकित अ‍ॅपचे प्रसिद्ध करण्याचे काम विचारण्यात आले. लोकप्रियता वाढली असल्यामुळे राजनच्या आवडीच्या गोष्टी, त्याचे फिरणे यावर फॉलोअर्सचे लक्ष असते, त्यामुळे लोकप्रियता आपसूकच मिळते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2018 1:36 am

Web Title: article about memes trending apps
Next Stories
1 सकस  सूप
2 हसत खेळत कसरत : पाठदुखीपासून मुक्ती
3 खिमा टोमॅटो सॅलड
Just Now!
X