19 September 2018

News Flash

सुंदर माझं घर : मंडल, कोस्टर

पूर्वी प्रसाद, नैवेद्य ठेवण्यापूर्वी त्याखाली मंडल मांडले जात असे.

(संग्रहित छायाचित्र)

श्रावण-भाद्रपद म्हणजे पूजा-अर्चा, व्रत-वैकल्यांचे महिने. पूर्वी हे सारं यथासांग करणं शक्य होतं, मात्र आता घरातील सर्वचजण नोकरी, व्यवसाय, अभ्यासात इतके गुंतलेले असतात की प्रत्येक लांबलचक कामासाठी एखादा झटपट पर्याय शोधला जातो. पूर्वी प्रसाद, नैवेद्य ठेवण्यापूर्वी त्याखाली मंडल मांडले जात असे. आता मंडल मांडून ठेवणे शक्य नसते. त्यामुळे पूजा, व्रतांत मंडल म्हणून वापरता येईल आणि व्रतवैकल्यांचा काळ संपला की टी कोस्टर म्हणून उपयुक्त ठरेल, अशी एक सोपी कलाकृती शिकू या.

साहित्य

आइसक्रीमच्या काडय़ा, टिकल्या, बटणे (सुशोभानाचे) रंग कामाचे साहित्य, पोस्टर कलर, गम इत्यादी.

कृती

*   आइसक्रीमच्या काडय़ा रंगाने रंगवून घ्या. रंगीत काडय़ासुद्धा दुकानात उपलब्ध असतात.

*   दोन विरुद्ध रंगांचे जोड आकर्षक पद्धतीने एकमेकांवर चौकोनात चिकटवून घ्या.

*   मधील बाजूस एका आड एक पट्टी चिकटवा.

*   थोडय़ा थोडय़ा अंतरावर बटणे, टिकल्या चिकटवल्यास अधिक आकर्षक दिसेल. बाहेरील बाजूवर अलगद चिकटवा व वाळू द्या.

*   अशा प्रकारे तयार केलेले मंडल पूजेसाठी वापरता येईल.

*   ४ किंवा ६ चा सेट तयार करून टेबलवर टी कोस्टर म्हणून वापरू शकता.

HOT DEALS
  • Apple iPhone 6 32 GB Gold
    ₹ 25199 MRP ₹ 31900 -21%
    ₹3750 Cashback
  • Honor 9 Lite 64GB Glacier Grey
    ₹ 13975 MRP ₹ 16999 -18%
    ₹2000 Cashback

*   परिचितांना भेट म्हणून सुद्धा देता येईल.

*   करून बघा झटपट मांडणी कोस्टर.

apac64kala@gmail.com

First Published on August 31, 2018 3:31 am

Web Title: article about t coaster art work