डॉ. अविनाश भोंडवे

दमा किंवा अस्थमा म्हणजे श्वसनमार्गाचा दीर्घकाळ चालणारा एक आजार. यात फु प्फुसांपर्यंत श्वास नेणाऱ्या नलिकांचा दाह होऊन त्या आकुंचन पावतात. त्यामुळे श्वास घेण्याच्या क्रियेला अडथळा येतो आणि दम लागतो. अगदी लहान वयापासून प्रौढत्वापर्यंतच्या आयुष्यभरात हा आजार केव्हाही डोके वर काढतो.अस्थमा असणाऱ्या व्यक्तींना काही कारणांमुळे श्वसनलिकेच्या आतील अस्तराला सूज येते आणि श्वसनमार्गाशी संपर्कात असणारे स्नायू आकुंचन पावतात. साहजिकच हा अंतर्गत मार्ग छोटा होतो. त्यामुळे श्वास खूप जोर लावून घ्यावा लागतो आणि दम्याचा झटका येतो.

autism spectrum disorder
Health Special: स्वमग्नता (autism spectrum disorder) म्हणजे काय? उपचारांवर लक्ष केंद्रित करा…
Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
narayana murthy experienced hunger for 120 hours hitchhiking in Europe 50 years ago but what happens your body starvation 5 day doctor said
नारायण मूर्ती राहिले होते १२० तास उपाशी; पाच दिवस उपाशी राहिल्याने शरीरावर काय परिणाम होतात?
Can those on insulin participate in exercise
व्यायामापूर्वी खावे की नंतर? मधुमेही व्यक्तीने व्यायाम करावा का? व्यायाम करताना काय काळजी घ्यावी, डॉक्टरांकडून जाणून घ्या

कारणे -* आजूबाजूच्या वातावरणामधील अ‍ॅलर्जीकारक गोष्टी, विषाणूंचा संसर्ग अशा अनेक गोष्टी दम्याच्या त्रासाला सुरुवात होण्यास कारणीभूत ठरतात.

*  धुळीमधील विषाणू, घरामधील पडदे, जाजमे, गालिचे, सतरंज्यांतील धूळ.

*  भितींवर किंवा पदार्थावर आलेली बुरशी

*  सिगारेट, विडी, तंबाखूचा धूर

*  धुम्रपान किंवा चूल वापरल्याने निर्माण होणाऱ्या धुरात लहान बाळांना दमा होण्याची शक्यता अधिक असते. गर्भवती महिला त्यात वावरल्यास त्यांच्या बाळांना दमा होऊ  शकतो.

*  हवेतील कार्बन आणि अन्य दूषित पदार्थापासून होणारे प्रदूषण

*  थंड हवा, हवामानातील बदल

*  भावनांचे अतिरेकी प्रदर्शन, रडणे किंवा जोरात हसणे

*  कमालीचा ताणतणाव

*  अन्नातील सल्फाईटस्, सुकामेवा, शीतपेये, मद्य.

*  गॅस्ट्रो इसोफेजिअल रिफ्लक्स डिसीज (जीईआरडी)- पोटातील अन्न रात्री झोपेत असताना अन्ननलिकेत प्रवेश करू पाहते. छातीत जळजळ होते आणि तीव्र दमा होतो.

*  कारखान्यांमध्ये वापरली जाणारे तीव्र रसायने

लक्षणे – श्वास घेताना छातीतून सूं..सूं असा आवाज येत घरघर सुरू होते. सुरुवात अचानक होते पण वारंवार त्रास होणे, रात्री किंवा पहाटे तीव्रता जास्त असणे. थंड ठिकाण, व्यायाम आणि छातीतली जळजळ यामुळे तीव्रता वाढते. अनेकदा लक्षणे आपोआपच कमी होतात. सुरुवातीला कोरडा आणि नंतर श्लेष्म खोकला येत राहणे. हालचाल केल्यास, व्यायाम केल्यास त्रास वाढणे. बरगडय़ांमधली त्वचा श्वासासोबत आत ओढली जाणे. तीव्रता वाढल्यास मानेभोवतालचे स्नायू श्वासासाठी वापरले जातात. ब्रॉन्कोडायलेटर्स (श्वसनमार्ग मोकळा करणारी औषधे) वापरल्यावर दम कमी होतो.

टप्पे – *  दम्याच्या उपचारासाठी त्याची पायरी किंवा तीव्रता ओळखावी लागते.

*  तीव्र दमा- व्यक्तीला एक वाक्य बोलतानाही दोन-तीनदा श्वास घ्यावे लागणे.

*  सौम्य- अधूनमधून त्रास होणे. काही दिवस किंवा तास त्रास असला तरी रुग्ण कार्यशील असणे.

*  सौम्य पण टिकणारा दमा- आठवडय़ातून एकदा तरी त्रास होणे.

*  मध्यम दमा- आठवडय़ातून एकदा किंवा रोज रात्री त्रास होणे.

*  सतत तीव्र दमा- सतत चालणारा, मधून मधून वाढणारा, रात्री उठवणारा, शारीरिक हालचालीत मर्यादा आणणारा त्रास होणे.

उपचार

*  फवारे : तोंडाने घेण्याचे ‘कॉर्टिकोस्टिरॉईड’ फवारे हा सर्वात योग्य उपचार असतो. इनहेलर, रोटाहेलर, नेब्युलायझर यांच्याद्वारे हा उपचार होतो.

*  औषधे-  श्वासनलिका रुंदावणारी, स्टीरॉइड्स, अ‍ॅण्टिअ‍ॅलर्जीक औषधे उपलब्ध आहेत, परंतु त्यांचे महत्त्व मर्यादित असते.

*  दम जास्त लागत असेल आणि सतत राहात असेल, तर रुग्णाला रुग्णालयात दाखल करून या औषधांसोबत प्राणवायू देण्याची गरजदेखील भासू शकते.

निरोगी श्वसननलिका

दम्यामुळे आंकुचित श्वसननलिका