13 December 2019

News Flash

बद्ध पद्मासन

पद्मासनाचे अनेक प्रकार आहे. बद्ध पद्मासन हा त्यापैकी एक.

योगस्नेह

पद्मासनाचे अनेक प्रकार आहे. बद्ध पद्मासन हा त्यापैकी एक. या आसनामुळे पाय मजबूत होतात. सततच्या सरावामुळे हृदय, यकृत, पोट व फुप्फुसांमधील अशक्तपणा कमी होतो. अपचनाचा त्रास कमी होतो.

कृती :

  • पद्मासनामध्ये बसा. या स्थितीमध्ये तुमच्या दुमडलेल्या दोन्ही पायांचे तळवे ओटीपोटाजवळ येतील.
  • उजवा हात तुमच्या पाठीमागे घ्या. त्यानंतर तुमच्या उजव्या हाताच्या पहिल्या व मधल्या बोटांनी उजवा पाय पकडण्याचा प्रयत्न करा.
  • आता डावा हात पाठीमागे घ्या. डाव्या हाताच्या पहिल्या व मधल्या बोटांनी डाव्या पायाचा अंगठा पकडण्याचा प्रयत्न करा.
  • हनुवटी छातीवर टेकवा आणि तुमच्या नाकाच्या शेंडय़ाकडे पाहा.
  • या स्थितीमध्ये स्थिर राहाण्याचा प्रयत्न करा. शांत व दीर्घ श्वास घ्या.

First Published on August 13, 2019 12:52 am

Web Title: baddha padmasana yoga
Just Now!
X