अधिक वेळ चालण्यासाठी आणि धावण्यासाठी आपल्या पोटऱ्या मजबूत असणे आवश्यक आहे. पायाचा सर्व भार पोटऱ्या सांभाळत असतात. त्यामुळे पोटरीचा स्नायू बळकट असणे गरजेचे आहे. आज आपण दोन विविध प्रकारांतील पोटरीच्या व्यायामाबाबत जाणून घेणार आहोत. या व्यायामांमुळे केवळ पोटरीच नव्हे तर पाऊल आणि पाय यांना जोडणाऱ्या सांध्याचा स्नायूही मजबूत होतो.

व्यायाम क्र. फ

  • सरळ उभे राहा. पावले सरळ आणि एकमेकांना समांतर असू द्या.
  • आता हळूहळू तुमच्या टाचा वर करा आणि चवडय़ांवर उभे राहण्याचा प्रयत्न करा. असे करताना पोटऱ्यांवर ताण येईल.
  • त्यानंतर हळूहळू टाचा खाली घ्या.
  • असे किमान २० वेळा करा. काही दिवसांनी संख्या वाढवा.

व्यायाम क्र. र

  • हा व्यायामही पोटरीचे स्नायू मजबूत करण्यासाठी केला जातो. या व्यायामात मात्र पावले एकमेकांना समांतर न ठेवता विरुद्ध दिशेला घ्यावीत. (पावले किमान ४५ अंश कोनात असावीत.)
  • आता हळूहळू टाचा वर करा आणि चवडय़ांवर उभे राहा. त्यानंतर हळूहळू टाचा खाली घ्या. किमान १० ते २० वेळा असे करा.
  • या व्यायामामुळे केवळ पोटऱ्यांचेच स्नायू नव्हे तर पायाचा खालील भाग आणि टाचांचे स्नायूही मजबूत होतात.