13 December 2019

News Flash

हराभरा कबाब

लहान मुलांना छोटय़ा सुट्टीसाठी देण्यासाठी उत्तम पदार्थ

संग्रहित छायाचित्र

|| डॉ. सारिका सातव

साहित्य

 • एक वाटी हिरवा वाटाणा (सोललेला)
 • अर्धी वाटी हिरवा कोवळा हरभरा (सोललेला)
 • दोन उकडलेले बटाटे
 • पालक चिरून १ वाटी
 • कोथिंबीर चिरून अर्धा वाटी
 • आले-लसून पेस्ट- अर्धा चमचा
 • जिरे-धने पावडर – अर्धा चमचा ल्ल चाट मसाला- अर्धा चमचा
 • लाल तिखट- पाव चमचा ल्ल तळण्यासाठी तेल चवीपुरते मीठ

कृती :

 • हिरवा वाटाणा, हरभरा वाफवून घ्यावे. (वाफवताना गरम पाण्यात कढईत वाफवावे. थोडी साखर टाकावी. हिरवा रंग टिकून राहतो.)
 • पालकही वेगळा वाफवून घ्यावा.
 • उकडलेले बटाटे, वाफवलेला वाटाणा, हरभरा व पालक एकत्र करून चांगले कुस्करून घ्यावे.
 • मीठ, जिरेपूड, धनेपूड, लाल तिखट, चाट मसाला, कोथिंबीर, आले-लसून पेस्ट हे सर्व कुस्करलेल्या मिश्रणात मिसळून पुन्हा व्यवस्थित कुस्करून घ्यावे.
 • या मिश्रणाने लिंबाएवढे छोटे गोळे करून घ्यावे. ल्ल कढईत तेल गरम करावे.
 • गोळे चपटे करून तळून घ्यावे.
 • मायक्रोओव्हनमध्ये तेल न वापरता बेक करू शकता.

वैशिष्टय़े :

 • आबालवृद्धांना आवडणारी चव व पदार्थ.
 • ब जीवनसत्त्व अधिक प्रमाणात.
 • लहान मुलांना छोटय़ा सुट्टीसाठी देण्यासाठी उत्तम पदार्थ
 • न आवडणाऱ्या इतर भाज्या त्यात मिसळू शकता.

First Published on August 13, 2019 12:52 am

Web Title: hara bhara kabab mpg 94
Just Now!
X