घरातलं विज्ञान : सुधा मोघे सोमणी, मराठी विज्ञान परिषद, अंबरनाथ विभाग

सणवार, लग्नसराई असली की सोने खरेदीचा हंगाम! लोक हौसेने सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करतात. अतिशय मौल्यवान धातू असल्याने लोक थोडे-थोडे करून सोने जमवतात.

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
RBI repo rate announcement Shaktikanta Das
आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे ठेवण्याचे कारण काय? जाणून घ्या

सोने इतके मौल्यवान असण्यामागे त्याची चकाकी हे एकमेव कारण नव्हे. अतिशय चकाकणाऱ्या या धातूचे काही अन्य गुणधर्मदेखील आहेत. धातूंचा गुणविशेष म्हणजे ते टणक असतात व चकाकतात. पण सोन्याची चकाकी काही वेगळीच. त्याच्या मोहात न पडणारी व्यक्ती विरळाच. मन मोहणाऱ्या चकाकीशिवाय सोन्याचा विशेष गुणधर्म म्हणजे तो निष्क्रिय (राजस) धातू आहे. त्यावर हवा, पाणी किंवा इतर रासायनिक पदार्थाचा परिणाम होत नाही. लोखंड गंजते, तांब्यावर हिरवट रंगाचा थर येतो, पण सोन्याचे क्षरण (कोरोझन) होत नाही. चांदीची चकाकीदेखील लोकांना आकर्षित करते; परंतु चांदी लवकर काळी पडते. हवेत जर सल्फर असेल तर चांदीच्या वस्तू लगेच काळवंडतात. चांदीची सल्फरबरोबर क्रिया होऊन चांदीचा सल्फाइड तयार होतो. या सल्फाइडचा रंग काळा असतो.

या चकाकणाऱ्या धातूंचे दागिने कर्णफुले, हार, बांगडय़ा इ. बनवायचे असेल तर त्याला चांगल्या प्रकारे आकार देता आला पाहिजे. इथे सोन्याची तन्यता व वर्धनीयता या गुणधर्माचा उपयोग होतो. सोन्याचा अतिशय पातळ पत्रा बनवता येतो व सोने ताणून त्याची बारीक तारदेखील तयार करता येते. सर्व धातूंमध्ये सोने द्वितीय क्रमांकाचा तन्य व वर्धनीय आहे. १ ग्रॅम सोन्यापासून अंदाजे अडीच किमी लांब सोन्याची तार बनवता येते. सोन्यापाठोपाठ या गुणधर्माच्या बाबतीत क्रमांक लागतो तो चांदीचा. या दोन गुणधर्मामुळे सोने, चांदी यांना हवा तो आकार देता येतो. केवळ दागिनेच नाही तर मंदिरांमध्ये कलशावर सोन्याचा पत्रा बसवला जातो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे अमृतसर येथील भव्य सुवर्णमंदिर!

सोने व चांदीपासून बनवलेल्या तारांचा उपयोग रेशीम साडी-वस्त्रांवर जरीचे काम करण्याकरिता होतो. पैठणी, बनारसी शालू यांची शोभा या जरीकामाने वाढते. जरी चांगल्या प्रतीची असल्यास एका पिढीतून पुढच्या पिढीपर्यंत दागिन्यांप्रमाणेच या साडय़ा/ शालूदेखील ठेव म्हणून सांभाळल्या जातात.

सोने व चांदीच्या वैशिष्टय़पूर्ण गुणधर्मामुळे त्यांचा वापर अलंकारांपर्यंत मर्यादित नसून इतर अनेक ठिकाणी दोन्ही धातू वापरले जातात. सर्व धातू विद्युतचे सुवाहक आहेत. सर्वोत्तम विद्युतवाहक धातू चांदी आहे. मौल्यवान असल्यामुळे आपण घरी किंवा इतर ठिकाणी ज्या विद्युतवाहक तारा वापरतो त्या तांब्याच्या असतात. चांदीनंतर तांबे हा दुसऱ्या क्रमांकाचा विद्युत सुवाहक आहे. कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स- जिथे विद्युत सर्किट अतिशय सूक्ष्म असतात व जिथे कार्यक्षमता उच्च असावी लागते तिथे सोने किंवा चांदीच्या तारा वापरण्यात येतात. तसेच सौरघटमध्ये चांदीच्या विद्युतवाहक तारा असतात. सोने  निष्क्रिय असल्याने त्याचे क्षरण होत नाही व विद्युत सर्किटचे आयुष्य दीर्घकाळ टिकते.

सोने शुद्ध स्वरूपात मृदू असते. त्यामुळे वापरण्याआधी त्यात चांदी किंवा तांबे मिश्रित करून मग दागिने बनवले जातात. रोझ गोल्ड जे आजकाल लोकप्रिय होत आहे त्यात तांबे मिश्रित करून सोन्याचा रंग गुलाबी करण्यात येतो. सोन्याची शुद्धता कॅरेट या एककात मोजली जाते. २४ कॅरेट सोने शंभर टक्के शुद्ध असते. दागिने बनवण्याकरिता भारतात २२ कॅरेट सोन्याचा वापर प्रचलित आहे.

आज सोने-चांदीबरोबरच प्लॅटिनम हा धातूदेखील लोकप्रिय होत आहे. प्लॅटिनम धातूंमध्ये सर्वाधिक तन्य आहे. अशा चकाकणाऱ्या वैविध्यपूर्ण गुणधर्म असलेल्या धातूंनी आपल्याला भुरळ घातली नाही तरच नवल!