ब्रेड आणि तत्सम पदार्थ भाजून खाण्यासाठी टोस्टरचा उपयोग केला जातो. बहुधा सँडविच ग्रिल करताना या उपकरणाचा वापर केला जातो. मात्र या उपकरणाची नियमित स्वच्छता आणि देखभाल करणेही तितकेच गरजेचे आहे.

* टोस्टरची साफसफाई करताना सर्वप्रथम त्याचा वीजपुरवठा बंद करावा. टोस्टरचा वापर झाल्यानंतर आधी तो थंड होऊ द्यावा आणि त्यानंरच साफसफाई करावी.

*  टोस्टरची बाहेरील बाजू कोरडय़ा कापडाने किंवा टिश्यू पेपरने साफ करावी.

* टोस्टरची आतील बाजू साफ करताना त्यामध्ये ब्रेडचे अडकलेले पदार्थ काढून टाकावे. त्यासाठी व्हिनेगर किंवा लिंबाच्या रसाचा वापर करावा.

* टोस्टर  साफ करताना जुन्या टूथब्रशचा वापर केला तरी चालेल. टूथ ब्रशमुळे आतमध्ये अडकलेले लहान लहान कण, पदार्थ निघण्यास मदत होते.

*  टोस्टर साफ करताना खरखरीत कागद किंवा कापडाचा वापर करू नये. स्पंज, मऊ ब्रश किंवा सुती कापडाचा वापर करावा.

* कोमट पाण्याने टोस्टर साफ केला तरी चालेल.