डॉ. मानसी पाटील

साहित्य

२ कप मैदा, अर्धा कप पिठीसाखर, पाव चमचा मीठ, १ मोठा चमचा तेल, दोन तृतीयांश कप पाणी

कृती

एका भांडय़ात मैदा, मीठ आणि पाणी एकत्र मळून घ्या, पिठाचे लहान-लहान गोळे तयार करून घ्या. त्यावर ओले कापड ठेवून प्लास्टिकने झाकून ठेवा. एक गोळा घेऊन पातळ पोळी लाटून घ्या. त्यावर पिठीसाखर भुरभुरवा. पिठीसाखर लागलेली पोळी चौकोन आकारात मोडून घ्यावी व पुन्हा पातळ लाटा. लाटलेल्या पोळीला थोडे तेल लावून पराठय़ासारखे तव्यावर भाजून घ्या. उरलेल्या कणकेचे गोळे अशाच पद्धतीने करा.