29 October 2020

News Flash

सेल्फीस कारण की..

स्मार्टफोन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. तितकेच दृढ नाते आपले ‘सेल्फी’शी जुळले आहे.

शुभम माळी याने काही दिवसांपूर्वी ‘लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा’ येथे भेट दिली. ज्या गोष्टींविषयी फक्त चित्रपट आणि पुस्तकांतून एकले-वाचले होते, तो प्रकल्प प्रत्यक्ष पाहणे हा त्याच्यासाठी एक विशेष अनुभव असल्याचे त्याने म्हटले आहे. या प्रकल्पातील आश्रमशाळेला भेट दिल्यावर तेथील चिमुकल्यांसोबत ‘सेल्फी’ काढण्याचा मोह त्याला आवरता आला नाही.

स्मार्टफोन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. तितकेच दृढ नाते आपले ‘सेल्फी’शी जुळले आहे. प्रसंग कोणताही असो, ठिकाण कुठलेही असो आपल्या मोबाइलच्या फ्रंट कॅमेऱ्याची ‘लेन्स’ तो क्षण/ठिकाण आपल्यासकट ‘कॅप्चर’ करण्यासाठी सदैव तत्पर असते. तरुणवर्गात तर विनाकारण ‘सेल्फी’ काढण्याची हौस दिसून येते. मात्र, आता तुमच्या ‘सेल्फी’ काढण्याला आम्ही एक कारण देत आहोत. सत्कारण. रोजच्या दिनक्रमादरम्यान कोणतेही चांगले काम करताना तुमचा ‘सेल्फी’ काढा आणि selfie.loksatta@gmail.com या इमेल आयडीवर आम्हाला पाठवा. तुम्ही करत असलेले काम थोरच असावे, असे काही नाही. पण त्यातून तुमची सामाजिक बांधिलकी नक्कीच दिसावी. ‘सेल्फी’ पाठवताना त्याबाबत १०० शब्दांत माहितीही पाठवा. कदाचित तुमच्या सेल्फीचे हे ‘कारण’ उद्या आणखी काहींसाठी प्रेरणा ठरेल.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2018 4:30 am

Web Title: inspiration cause for selfie
Next Stories
1 मस्त मॉकटेल : कोकम कॅप्रियोओस्का
2 हसत खेळत कसरत : खांदा, कोपर, छातीच्या मजबुतीसाठी..
3 स्वराज्याची तिसरी राजधानी
Just Now!
X