07 April 2020

News Flash

इंधन वाचविणाऱ्या कारच्या शोधात

जानेवारी महिन्यात कारच्या झालेल्या खरेदी विक्रीचा अभ्यास केला असताही हाच कल दिसून येतो.

जानेवारी महिन्यातील वाहन खरेदी विक्रीची आकडेवारी ‘फाडा’ने (फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डिलर्स असोसिएशन) जाहीर केली असून ती वाहन उत्पादकाची चिंता वाढविणारी आहे. पण चित्र अगदीच निराशाजनक नाही. गेल्या वर्षभरात या उद्योगावर मंदीचा परिणाम दिसत आहे. या पार्श्वभूमीवर वाहन संशोधन क्षेत्रातील संस्थांचे अहवाल समोर येत आहेत. यात वाहन खरेदीकडे खरेदीदारांनी अगदीच पाठ फिरवल्याचे चित्र नाही. पण खरेदीदार चोखंदळ झाला असून त्याचा पसंतीक्रम बदललेला दिसत आहे. अगदी भविष्यातील बदलत्या तंत्राचा विचार करीत  इंधनासाठी परवडतील आशा कारच्या शोधात खरेदीदार दिसत आहेत.

पुढील काळात वाहन खरेदी करायचे आहे, पण त्यात अत्याधुनिक तंत्रज्ञान असावे, चांगल्या सुरक्षा प्रणालींचा वापर केलेला असावा व अत्यंत महत्त्वाचे म्हणजे ते वाहन इंधनाबाबत परवडणारे म्हणजे मायलेज देणारे असावे.. आशा अपेक्षा खरेदीदारांच्या समोर येत आहेत. एका सव्‍‌र्हेक्षनानुसार ४६ टक्के नागरिकांनी ‘एसयूव्ही’ वाहन खरेदीला पसंती दिली तर ३४ टक्के नागरिकांनी सेडान व १३ टक्के नागरिकांनी हॅचबॅक प्रकारातील वाहन खरेदीची इच्छा व्यक्त केली आहे. यातील ८० टक्के खरेदीदार सुरक्षेला महत्त्व देतात. त्यांना सुरक्षा साधनांचा वापर जास्त असलेली वाहन खरेदी करायची आहेत. तर ६४ टक्के नागरिक कमी इंधन लागणाऱ्या कारच्या शोधात आहेत. ५७ टक्के नागरिकांना वाहनात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर झालेली वाहने खरेदी करायची आहेत. त्यामुळे सुरक्षा प्रणाली, इंधन क्षमता व अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली वाहनांच्या शोधात आहेत, हे चित्र दिलासादायक आहे.

जानेवारी महिन्यात कारच्या झालेल्या खरेदी विक्रीचा अभ्यास केला असताही हाच कल दिसून येतो. या महिन्यात कार विक्रीत पहिल्या दहामध्ये मारुती सुझुकीची डिझायर पहिल्या क्रमांकावर आहे. २२,४०६ कारची विक्री झाली आहे. दुसऱ्या क्रमांकावर याच कंपनीची बलेनो असून २०,४५८ कारची विक्री झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत मारुती सुझुकीच्या ‘स्वीप्ट’ने आपले तिसरे स्थान कायम ठेवत १९,९८१ कार विक्री झाली आहे. तर गेल्या वर्षी पहिल्या क्रमांकावर असलेल्या ‘अल्टो’ला मात्र यावर्षी खरेदीदारांनी थोडीसी नापसंती दाखवत चौथ्या क्रमांकावर आहे. ‘अल्टो’ची १८,९१४  कारची विक्री झाली आहे. मारुती सुझुकीच्या वॅगन आरच्या सुधारित आवृत्तीने ग्राहकांनी भुरळ घातली असून गेल्या वर्षी नवव्या स्थानावरून ती पाचव्या क्रमांकावर आली आहे. आणखी एक नोंद करावीशी वाटते ती अलीकडेच भारतीय बाजारात आगमन झालेल्या किआ या वाहन उत्पादक कंपनीची. आगमनानंतर पहिल्या महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्येच ‘किआ’च्या सेल्टॉसने पहिल्या दहामध्ये आपले स्थान निर्माण केले. जानेवारीतही या कारने आपला करिष्मा कायम ठेवत सहाव्या क्रमांकावर आहे. ही आकडेवारी देण्याचे कारण म्हणजे सर्वेक्षणात वाहन खरेदीदारांनी नोंद केलेली मते व प्रत्यक्षात खरेदी करतानाही वाहन खरेदीदारांनी दाखवलेली पसंती यात साम्य आहे.

होंडा जॅझ

२०१८ मध्ये भारतीय बाजाराचे लक्ष केंद्रित करणाऱ्या होंडा जॅझने १८.२ ते २७.३ किमी मायलेज देणाऱ्या आपल्या आवृत्या दाखल केल्या. त्यात मॅन्युअल डिझेल २७.३, स्वयंचलित पेट्रोल १९.०, मानवनियंत्रित पेट्रोल १८.२ किमीचा मायलेज देतात.

ह्य़ुंदाई ग्रॅँड आय-१० नॉइस

गत वर्षी बाजारत आलेली ‘ह्य़ुंदाई ग्रॅँड आय-१० नॉइस’ या कारचे स्वयंचलित व मानवनियंत्रित डिझेल प्रकार २६.२ चे मायलेज देते तर स्वयंचलित व मानवनियंत्रित पेट्रोल प्रकार २०.७ किमीचे मायलेज देतो.

फोर्ड अ‍ॅस्पायर

फोर्ड कंपनीच्या या कारच्या विविध आवृत्त्यांनी एक लिटरमागे १६.३ ते २६.१ किमीचे मायलेज दिले आहे. यातील मानवनियंत्रित डिझेल प्रकार २६.१, मानवनियंत्रित पेट्रोल प्रकार २०.४, स्वयंचलित पेट्रोल प्रकार १६.३ तर मानवनियंत्रित सीएनजी प्रकार २०.४ किमीचे मायलेज देतो.

मारुती सुझुकी बलेनो

या कार प्रकारातील विविध मॉडेल ग्राहकांना १९.० पासून २७.४ किमीचा मायलेज देतात. यातील मानवनियंत्रित डिझेल प्रकार २७.३९ किमी, मानवनियंत्रित पेट्रोल प्रकार २३.८७ किमी, स्वयंचलित पेट्रोल प्रकार २१.४ किमी मायलेज देतो.

होंडा सिटी

या महिन्यात होंडा सिटी आपली नवी कार मॉडेल्सची रेंज बाजारात दाखल करीत असून ती १७.१४ ते २५.६ किमीचे मायलेज देण्याचा दावा करण्यात आला आहे. त्यातील मानवनियंत्रित डिझेल प्रकार २५.६ तर स्वयंचलित पेट्रोल प्रकार १८ किमीचा मायलेज देणार आहे.

फोर्ड फिगो

२०.४ ते २५.५ किमीचे मायलेज देण्याचे आव्हान पेलले आहे. यातील डिझेल प्रकार २५.५ किमी, तर  पेट्रोल प्रकार २०.४ किमीचा मायलेज देत आहे.

मारुती सुझुकी डिझायर

ही नव्या काळातील आव्हानांचा विचार करून २०१७ मध्ये भारतीय बाजारात दाखल झालेली कार आहे. ही म्यॅन्युअल (मानवनियंत्रित) आणि ऑटोमॅटिक (स्वयंचलित) कार्यपद्धती असणारी कार आहे. यातील डिझेल प्रकार एक लिटर मागे २८.४ किमी तर पेट्रोल २२.० किमी मायलेज देतो.

मारुती सुझुकी स्विफ्ट

या कारचे नवीन मॉडेल २०१८ मध्ये बाजारात दाखल झाले असून ते मानवनियंत्रित आणि स्वयंचलित कार्यपद्धती असणारे आहे. यातील डिझेल प्रकार एका लिटर मागे २८.४ तर पेट्रोल प्रकार २२.० मायलेज देते.

मारुती सुझुकी सियाझ

ही सुझुकीने भारतीय बाजारात दाखल केलेली स्मार्ट हायब्रीड कार ठरली आहे. ही पेट्रोल कार असून यातील मानवनियंत्रित प्रकार २०.२८ तर स्वयंचलित प्रकार २८.९ किमीचा मायलेज देतो.

होंडा अमेझ्

२०१८ मध्ये बाजारात दाखल झालेल्या या कारच्या मायलेजच्या बाबतीत एक लिटरला १९ ते २७.४ किमी असे वर्गीकरण करता येईल. त्यात मानवनियंत्रित डिझेल प्रकार एक लिटरमध्ये २७.४ किमी, स्वयंचलित डिझेल प्रकार एक लिटरमध्ये २३.८ किमी, मानवनियंत्रित पेट्रोल प्रकार एका लिटरमध्ये १९.५ किमी आणि स्वयंचलित पेट्रोल प्रकार एका लिटरमध्ये १९ किमीचा मायलेज देतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2020 12:11 am

Web Title: looking for a fuel saving car akp 94
Next Stories
1 ट्रॅफिक सेन्स..
2 एमजीची ‘हेक्टर प्लस’
3 वाहनांचे इंधन
Just Now!
X