विजय दिवाण

‘नाग’ वंशाच्या अनेक जमाती भारताच्या ईशान्येकडील नागालँड, मणिपूर, अरुणाचल आणि काही प्रमाणात आसाम या राज्यांत वास्तव्य करून आहेत. भारतात एकूण सोळा प्रमुख नाग जमाती आढळतात. या जमाती-जमातींमध्ये भाषिक आणि सांस्कृतिक वैविध्य मोठे असते. जमातींच्या निरनिराळ्या भाषांवर काही प्रमाणात तिबेटी आणि ब्रह्मदेशी भाषांचे संस्कार आहेत.

sewage treatment plants for residential complexes from thermax
‘थरमॅक्स’कडून निवासी संकुलांसाठीही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प; पुनर्वापरामुळे पाण्याची ८० टक्के बचत शक्य
how to plant flower plant it garden
Gardening tips : उन्हाळ्यातही सदा बहरलेली राहील सदाफुली! रंगीबेरंगी फुलांसाठी लक्षात ठेवा ‘या’ टिप्स
Here's Why You Should Never Reheat Cooking Oil
Reusing Cooking oil: एकदा वापरलेल्या तेलाचा सतत वापर करता का? आरोग्यासाठी ठरू शकते घातक
Addicted to junk food and can’t seem to stop Here’s how to overcome it
तुम्हाला जंक फूड खाण्याचे व्यसन आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कशी सोडावी ही वाईट सवय

निरनिराळ्या नाग जमातींची खेडी ही त्यांच्या वेगवेगळ्या सांस्कृतिक प्रथा आणि परंपरांनुसार वेगवेगळ्या धाटणीची असतात. त्यांच्या खेडय़ांना ते लोक ‘खेल’ असे म्हणतात. प्रत्येक ‘खेल’मध्ये बांबू आणि वाळलेले गवत वापरून नीटसपणे शाकारलेल्या झोपडय़ा असतात. या झोपडय़ांच्या अग्रभागी खास सजावट केलेली एक प्रमुख झोपडी असते. तिला नागामी भाषेत ‘मोरंग’ असे म्हणतात. ही झोपडी एखाद्या ग्रामपंचायतीसारखी सार्वजनिक वापरासाठी बनवलेली असते. जमातींच्या तरुण पिढीला नाग-वंशांच्या चालिरीती शिकवणे, तरुण-तरुणींना तारुण्यसुलभ कला-कौशल्यांचे नीट प्रशिक्षण देणे, त्यांना गावातील अनुभवी प्रौढांमार्फत नाग संस्कृती, परंपरा आणि प्रथा यांबद्दल मार्गदर्शन घडवणे, असे समाज बांधणीचे कार्यक्रम या ‘मोरंग’ झोपडीमध्ये दररोज पार पाडले जातात. अनेक नाग जमातींच्या गावांत असणाऱ्या मोरंग आणि इतरही निवासी झोपडय़ांमध्ये सुंदर लाकडी कोरीवकाम केलेल्या उत्तम कलाकृतीही दिसून येतात.

भारताच्या ईशान्य सीमा भागात ज्या उपहिमालयीन डोंगर-टेकडय़ा आहेत. त्या डोंगरांच्या खाली, किंवा मधल्या उतरणींवर, आणि डोंगर-माथ्यावर निरनिराळ्या नाग-जमाती राहतात. हे नाग लोक डोंगरांच्या उतरणींवर फारशी मोठी शेती करू शकत नाहीत. त्यामुळे डोंगरांत कुत्र्या-मांजरापासून कोल्हय़ा लांडग्यांपर्यंत मिळेल त्या प्राण्याची शिकार करून आपले पोट भरणे, हे त्यांना क्रमप्राप्त असते. ही गोष्ट आम्हाला कशी कळली असेल? आमच्या दौऱ्यात आम्ही मणिपूरवरून नागालँडकडे जेव्हा रवाना झालो, तेव्हा  वाटेत एका बाजूला भाजीचे दुकान होते. त्या दुकानाबाहेर शिकार करून आणलेले एक रानमांजर एका खांबाला टांगलेले होते. आमच्या सोबत अंगामी नाग जमातीचा जो सुशिक्षित गाईड होता, त्याने मला विचारले, ‘माझ्या वडिलांना रानमांजर खायला आवडते. तुमची हरकत नसेल तर मी ते रानमांजर विकत घेऊन घरी नेऊ  का?’ आम्ही हो म्हटल्यावर त्याने आठशे रुपयांना ते मृत रानमांजर विकत घेतले आणि कागदात गुंडाळून गाडीच्या डिकीत ठेवले. नागालँडमध्ये बरेल आणि जाफू या डोंगराळ प्रदेशांत वसलेल्या खोनोमा आणि जोत्सोमा या दोन खेडय़ांत आम्ही गेलो. खोनोमा इथे आमचा मुक्काम ख्रिएनी मेरू नावाच्या एका नाग गृहस्थाच्या घरी होता. घरी त्याची सुगरण बायको मेगोन्गो आणि कन्या केोसिनो या दोघी होत्या. ख्रिएनी मेरू हा मोठा सज्जन आणि हरहुन्नरी गृहस्थ होता. त्याने छंद म्हणून नानाप्रकारचे कीटक आणि फुलपाखरे गोळा केलेली होती. त्याच्या घरामागे उतरणीवर असणाऱ्या बागेत नागालँडमध्ये दुर्मीळ होत चाललेली अनेक झाडे आणि औषधी वनस्पती होत्या. त्याचा कीटकांचा वैविध्यपूर्ण संग्रह आणि त्याची बाग पाहून मला जाणवले, की असेच आणखी काही ख्रिएनी मेरू निर्माण झाले, तर या ईशान्येकडील दुर्गम भागांत जैवविविधता संरक्षणाचे काम सोपे होऊन जाईल. तिकडे जोत्सोमा नावाच्या आणखी एका खेडय़ात आम्ही एका नागवंशीय आजीबाईच्या घरी गेलो. घर कसले, एक चंद्रमौळी झोपडीच ती!  घराच्या एका कोपऱ्यात चुलीत लाकडे पेटवलेली होती. चुलीवर एक मळकी किटली ठेवलेली होती. चुलीच्या आसपास एक कढई, एक उखळ, दोनतीन डबे, एवढीच मोजकी मालमत्ता होती. झोपडीच्या छताखाली मक्याची आणि काही धान्यांची कणसे टांगलेली होती. काही भांडय़ांमध्ये निरनिराळ्या बियाही ठेवलेल्या होत्या. त्या आजीने दिलेला चहा पिऊन आम्ही निघालो तेव्हा दिसले, की त्या डोंगराच्या उतरणीवर सपाट केलेल्या छोटय़ाशा जागेत ती आजीबाई मका, साळ, पालेभाज्या, टोमॅटो आणि काही फळे पिकवत असे आणि त्यांची बी-बियाणी जतन करून ठेवत असे. हे नाग वंशीय लोक आजही बाजारची संकरित किंवा जनुकीय बियाणी वापरत नाहीत. त्यामुळेच असेल कदाचित, पण तिथली जैवविविधता अद्यापही टिकून आहे.

नागामी सामायिक भाषा; इंग्रजीचा सर्रास वापर

नाग लोक मुळातच अत्यंत लढाऊ वृत्तीचे आहेत. भारतातल्या पूर्वीच्या इंग्रजी राजवटीविरुद्ध त्यांनी अनेक कडवे असे सशस्त्र लढे दिलेले होते. शत्रूचा वध करून त्याचे शिर स्वत:च्या घरात टांगून ठेवण्याची पद्धत अगदी २०व्या शतकाच्या प्रारंभापर्यंत त्यांच्यामध्ये प्रचलित होती. प्रत्येक नाग जमातीचे लोक हे त्यांची वेगळी भाषा आपसातल्या दैनंदिन व्यवहारांत आवर्जून वापरतात. परंतु इतर नाग जमातींशी संवाद करताना मात्र साऱ्या जमाती ‘नागामी’ या सामायिक भाषेचा उपयोग करतात. इंग्रजी राजवटीपासूनच तिकडे बहुतांश नाग मुलांना इंग्रजी भाषेचे शिक्षण मिळत आलेले आहे. त्यामुळे त्यांच्या बहुतेक जमाती या आता बऱ्यापैकी सुशिक्षित आहेत. आणि व्यवहारांत त्या इंग्रजी भाषेचा वापर सर्रास करीत असतात.