24 January 2020

News Flash

नटराजासन

नटराज या देवतेची मूर्ती ज्याप्रमाणे असते, त्याप्रमाणेच स्थिती हे आसन करताना होते.

नटराज या देवतेची मूर्ती ज्याप्रमाणे असते, त्याप्रमाणेच स्थिती हे आसन करताना होते. त्यामुळे या आसनाला नटराजासन असे म्हणतात. या आसनामुळे शरीर सुडौल होते आणि एकाग्रता वाढते. या आसनामुळे नितंब, मांडय़ा, कंबर यांचे स्नायू मजबूत होतात.

कृती :

  • सर्वप्रथम ताडासनामध्ये म्हणजेच सरळ ताठ उभे राहावे.
  • दीर्घ श्वास घेत सर्व वजन डाव्या पायावर तोलावे.
  • उजव्या पायाची टाच नितंबाच्या दिशेने पाठीमागून वर उचलावी.
  • जास्त दाब देऊन डावा पाय सरळ ताठ ठेवावा आणि सर्व शरीराचा भार त्यावर तोलावा.
  • आता उजच्या हाताने वर उचललेल्या उजव्या पायाचे पाऊल पकडावे.
  • डावा पाय सरळ आणि डावा हात हवेत समोर ठेवावा.
  • या आसनस्थितीत २० ते ३० सेकंद राहावे.
  • त्यानंतर हळूहळू आसन सोडावे आणि पूर्ववत ताडासनामध्ये यावे.

First Published on July 23, 2019 2:44 am

Web Title: natarajasana mpg 94
Next Stories
1 चंद्रावरची वाहने
2 बाजारात नवे काय? : इथेनॉलवर चालणारी देशातील पहिली बाइक
3 व्हिंटेज वॉर : फोक्सवॅगन बीटल : मूर्ती लहान..
Just Now!
X