‘केटीएम’कडून भारतात ७९० डय़ूक सादर

जगातील प्रथम क्रमांकाचा प्रीमियम मोटरसायकल ‘केटीएम’ने त्यांची बहुप्रतीक्षित ७९० डय़ूक बाजारात उतरवण्याची घोषणा मुंबईमध्ये केली. ही मध्यम वजनाची सुपरबाइक श्रेणीतील सर्वात आकर्षक आणि मजबूत मोटरसायकल आहे. प्रारंभिक किंमत ८,६३,९४५ (एक्स-शोरूम संपूर्ण भारतासाठी) आहे. आजपासून ९ शहरांमध्ये बुकिंगला प्रारंभ झाला आहे.  ही सुपरबाइक दिसायला स्पोर्टी आहे. कटिंग एज डिझाईन, अतिशय सुलभ हाताळणी आणि सवरेत्कृष्ट कार्य प्रदर्शनामुळे ती चालवणाऱ्याला प्रत्येक परिस्थितीत तिच्यावर नियंत्रण ठेवणे सहज शक्य होते. सुपरबाइक चालवण्याचा अद्भुत आनंद केटीएम ७९० डय़ूक देते.

९९ सीसी एल सी ८ सी इंजिन, ज्याचा केटीएममध्ये प्रथमच वापर करण्यात आला आहे. ते अतिशय हलक्या अशा फ्रेम्समध्ये बसवण्यात आल्यामुळे बाइकचे वजन कमी आहे. ७९० डय़ूकचे सर्वात खास वैशिष्टय़ म्हणजे ती रायडिंग प्रिसिजनची सर्वोच्च पातळी गाठण्याची हमी देते. वापरलेल्या यंत्रणेमुळे मोटारसायकलस्वाराला वाहन चालवताना आत्मविश्वास आणि नियंत्रणाची हमी मिळू शकते, असा दावा कंपनीने केला आहे.

अवान मोटर्सद्वारे दोन अत्याधुनिक ई वाहने

अवान मोटर्सने अत्याधुनिक संकल्पनांवर आधारित  दोन नवीन ई वाहनांचे अनावरण नुकतेच केले. पहिले संकल्पना ई वाहन ७२ वॅट २२ एएच लिथियम आयन बॅटरीसह चालविले जाईल आणि प्रत्येक चार्जवर ८० ते २०० किलोमीटर प्रति तास अशी उत्कृष्ट श्रेणी प्रदान करेल. १२०० वॅट मोटर पॉवरसह, वाहनाचा कमाल वेग ६० किलोमीटर प्रति तास असेल. तर दुसरे ई वाहन ६० वॅट ३५ एएच लिथियम आयन बॅटरीसह सुसज्ज असेल. त्याला ५० ते ८० किलोमीटर वेग श्रेणी आणि ४५ किलोमीटर प्रति तास गती असल्याचा दावा कंपनीने केला आहे.