शेफ नीलेश लिमये

साहित्य :

तंदूर चिकन बोनलेस १०० ग्रॅम, ५-६ ऑलिव्हज, २५ ग्रॅम बारीक चिरलेला कांदा, संत्र्याचा एक काप.

ड्रेसिंगकरता – १ कप संत्र्याचा रस, २ लहान चमचे तेल, १ चमचा मिरचीची जाडसर पूड, मीठ, मिरपूड, पार्सली, मिक्स्ड सॅलडची पाने.

कृती :

एका पॅनमध्ये संत्र्याचा रस घालून तो थोडा घट्ट होईपर्यंत आटवून घ्या. संत्र्याचा रस, पार्सली, मिरचीची जाडसर पूड आणि ऑलिव्ह ऑइल एकत्र ढवळून घ्या.

तंदूर चिकनचे बारीक  बारीक तुकडे करून घ्या. खायला देताना ताटात लेटय़ूसची पाने पसरा. त्यावर तंदूर चिकन, कांदा, ऑलिव्हज सगळे एकत्र करून घ्या. त्यावर ड्रेसिंग घाला. चटपटीत ऑरेंज-चिकन सॅलड तय्यार. जर तुमच्याकडे तंदूर चिकन नसेल तर चिकनचे बारीक तुकडे करून ते आवडीनुसार मसाला लावून तव्यावर परतून घ्या आणि मग ते सॅलडमध्ये वापरा.