हे आसन हात पाठीमागे घेऊन केले जाते. त्यामुळे त्याला पश्चिम नमस्कारासन असे म्हटले जाते. या आसनामुळे हात, पोट आणि पाठीचे स्नायू बळकट होण्यास मदत होते. या आसनामुळे पाठीच्या वरच्या भागाला ताण मिळतो. खांद्याचे सांधे आणि छातीच्या स्नायूंनाही ताण मिळतो.

कृती :

* प्रथम ताडासन करावे.

* खांदे सैल करा आणि गुडघे थोडे वाकवा.

* दोन्ही हात मागे घेऊन बोटे खाली असलेल्या स्थितीत तळहात एकमेकांना चिकटवा.

* श्वास घेत बोटे पाठीकडून वळवून वरच्या दिशेला करूया.

* गुडघे वाकलेले आणि तळहात एकमेकांना व्यवस्थित चिकटलेले आहेत का याकडे लक्ष द्या.

* दीर्घ श्वास घेत या स्थितीत स्थिर राहूया.

* श्वास सोडत बोटे खाली वळवूया.

हळूवार हात शरीराशेजारी नेऊल ताडासनात उभे राहूया.