|| अलका फडणीस

साहित्य

भारंग भाजी २-३ जुडय़ा चांगल्या कोवळ्या बघून घ्या. कांदा १ बारीक चिरून, ओलं खोबरं पाव वाटी, हिंग चिमूटभर, मोहरी अर्धा चमचा, तेल १ मोठा चमचा, १ हिरवी मिरची तुकडे करून, सी.के.पी. मसाला – अर्धा चमचा.

कृती

भारंग चांगला धुऊन घेऊन बारीक चिरा. पातेल्यात तेल तापवून त्यात मोहरी, हिंग घालून त्यावर कांदा घालून परता. कांदा मऊ झाल्यावर त्यात हळद, मिरचीचे तुकडे आणि सी.के.पी. मसाला घालून त्यावर भारंग घालून परता. चांगली वाफ आणा. चांगली शिजली की त्यावर खोबरं घाला.

टीप : ही भाजी रंगाने काळी होते, मोड आलेले वाल घालूनदेखील करता येते.