अनेकदा मुले नेहमीची भाजी-पोळी खायला नाक मुरडतात, का-कू करतात. अशा वेळी वापरण्यासाठी एक भन्नाट पाककृती म्हणजे सिक्रेट पिझ्झा.

साहित्य – बाजारात मिळणारा पिझ्झा बेस,

शक्यतो गव्हाचा आणा. घरात केलेली कोणतीही भाजी अथवा उसळ, केचप, सॉस, चीझ.

कृती –  पिझ्झा बेसवर भाजी किंवा उसळ पसरा. त्यावर भरपूर चीझ किसून घाला. त्यावर केचप, सॉसही घाला. हा पिझ्झा तव्यावर गरम करा किंवा ओव्हनमध्ये पाच मिनिटे ग्रील करा. मुले आवडीने फस्त करतात, फक्त त्यातील साहित्याचे गुपित कळू द्यायचे नाही.