डॉ. सारिका सातव

साहित्य

भिजवलेले सोया ग्रॅन्युअल्स अर्धी वाटी, उकडलेला एक मोठा बटाटा, बारीक  चिरलेले आणि वाफवलेले गाजर एक वाटी, वाफवलेला मटार एक वाटी, बारीक चिरून वाफवलेला पालक अर्धी वाटी, वाफवलेल्या इतर भाज्या एक वाटी (ब्रोकोली, श्रावण घेवडा, कोबी इ.), मीठ चवीनुसार, धने-जिरे पावडर, आलं-लसूण पेस्ट, लाल तिखट, गरम मसाला चवीनुसार, कोरडा भाजलेला रवा किंवा बेसन अर्धी वाटी.

कृती

* वाफवलेल्या सर्व भाज्या, सोया ग्रॅन्युअल्स, बटाटा, मीठ व मसाल्याचे सर्व पदार्थ एकत्र मिसळून घ्यावेत.

* या मिश्रणाचे छोटे कटलेट तयार करावेत.

* कटलेट रवा किंवा बेसनात बुडवून तळून घ्यावेत किंवा ओव्हनमध्ये बेक करून घ्यावेत.

* कोथिंबीर किंवा पुदिना चटणी आणि दह्य़ाबरोबर खाण्यास द्यावेत.

वैशिष्टय़े

* सर्व वयोगटांसाठी उपयुक्त.

* आवडीनुसार भाज्यांचे प्रमाण कमी-जास्त करू शकता.

* सोया ग्रॅन्युअल्समुळे प्रथिने आणि सर्व भाज्यांमुळे जीवनसत्त्वे अधिक प्रमाणात मिळतात.

* लहान मुलांना छोटय़ा ब्रेकमध्ये देण्यास उत्तम.

* भाज्या कमी खाणाऱ्यांसाठी उत्तम पदार्थ.