‘शास्त्र’ असतं ते.. : सौ. सुधा मोघे-सोमणी मराठी विज्ञान परिषद, अंबरनाथ विभाग.

जिथे हात धुण्यासाठी मुबलक पाणी नाही त्या ठिकाणी सॅनिटायझरचा वापर करावा म्हणजेच प्रवासात. सॅनिटायझरमध्ये असे रसायन (अल्कोहोल) असते ज्याने सूक्ष्म जिवाणूंचा नाश होतो. मात्र सॅनिटायझर हातावर घेऊन वर सांगितल्याप्रमाणे हात स्वच्छ होईपर्यंत एकमेकांवर घासावेत.

साबण वापरून हात का धुवावेत?

रोजच्या जीवनात कोणतेही काम करताना सर्वात जास्त वापरला जाणारा शारीरिक भाग म्हणजे हात. कुठलाही पदार्थ उचलताना आपण हाताचाच वापर प्रामुख्याने करतो. आपल्या आसपास असणाऱ्या सर्वच पृष्ठभागांवर धूळ व सूक्ष्म जिवाणू असतात. यातील काही जिवाणू शरीरास अपायकारक असतात. त्यामुळे हात स्वच्छ धुणे हाच त्यावरील उपाय. आता हे हात कशाने धुतल्याने स्वच्छ होतील, तर साबण व स्वच्छ पाणी हे त्यावरील उपाय आहेत. साबणातील रासायनिक गुणधर्म (सरफॅक्टंट) व पाणी यांच्या साहाय्याने हाताला चिकटलेली धूळ व सूक्ष्म जिवाणू हे दोन्ही हात एकमेकांवर घासल्याने निघून जातात. मात्र हे हात धुताना एकमेकांवर वरच्या बाजूने व खालच्या बाजूने, बोटांच्यामध्ये कमीतकमी २० सेकंद घासणे आवश्यक आहे.