उन्हाळा, त्यातही शाळेला सुट्टी म्हणजे आइसक्रीमशी गट्टी ठरलेलीच! गारेगार आइसक्रीम खाऊन झालं की उरतात त्या काडय़ांचा आपण पुनर्वापर करू शकतो आणि सुटीतला रिकामटेकडा वेळ सत्कारणीही लावू शकतो. या काडय़ांपासून रंगीबेरंगी टिकाऊ फुले कशी बनवता येतील आणि घरातील टाकाऊ साहित्याचा वापर करून ती कशी सजवता येतील, ते पाहू.

साहित्य :

जुने बटन, आइसक्रीमच्या काडय़ा, अ‍ॅक्रेलिक रंग, रंगकामाचे साहित्य, कात्री, ग्लिटर, गम.

कृती

  • टोकाशी गोलाकार असलेल्या काडय़ा वेगळ्या करा.
  • ५-६ काडय़ा पाकळ्यांप्रमाणे जोडून फुलाचा आकार द्या.
  • मागील बाजूला एक सरळ काडी जोड व हिरव्या रंगात रंगवा.
  • सर्व पट्टय़ा चिकटवा व रंगवा. ग्लिटर लावताना त्याखाली स्टिकर्स लपतील याची काळजी घ्या.
  • मध्यावर गम पसरवा व बटण चिकटवा.
  • खूप कडय़ा जमवल्यास अनेक फुले तयार करून सुंदर पुष्पगुच्छ साकारता येईल.
  • या फुलांवर, धन्यवाद देणारे शुभेच्छापत्र जोडून, रिटर्न गिफ्ट म्हणून देता येईल.

apac64kala@gmail.com