राजेंद्र श्री. भट rsbhat1957@gmail.com

आपल्याकडे ऊन किती वेळ व किती प्रमाणात येते यावर आपण कोणती फुलझाडे लावू शकतो ते ठरते. फुलझाडांमध्ये हंगामी (अबोली, झेंडू, अस्टर) आणि बहुवर्षांयु (अबोली, गुलाब, चाफा) अशी झाडे आपण लावू शकतो. यात परत वाढीनुसार झुडपे, वेली असे प्रकार असतात. सामान्यपणे रंगीबेरंगी आणि सुगंधी असे फुलांचे दोन प्रकार असतात. काही फुलझाडे आवर्जून लावलीच जातात. उदा. गुलाब व मोगरा.

What is a Bambi Bucket
बांबी बकेट म्हणजे काय? IAF ने नैनितालच्या जंगलात का केला त्याचा वापर?
Robin Hood thief from Bihar
फक्त स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने करायचा घरफोडी; बिहारच्या ‘रॉबिन हूड’ला केरळमध्ये केलेली चोरी पडली महागात
how to make fish egg omelette Fish egg recipe in marathi
झटपट नाश्त्यासाठी बनवा “माशाच्या अंड्याचे ऑमलेट” लहान मुलंही खातील आवडीने
bmc, mumbai municipal corporation, Undertake Rs 209 Crore Drainage Project, Prevent Flooding, Andheri Subway, milan subway, bmc drainage project, mumbai monsoon, mumbai waterlogging, mumbai news,
अंधेरी सब वे पूरमुक्त करण्यासाठी आणखी २०९ कोटी, किमान तीन वर्षे लागणार

गुलाब : गुलाबाच्या झाडाला थंड व कोरडे हवामान लागते. जेवढे ऊन जास्त तेवढे झाड छान वाढते. कमी पावसाच्या पण थंड प्रदेशात गुलाबाची वाढ चांगली होते, फुले जास्त येतात.

साधारणपणे थंडीच्या काळात गुलाब भरभरून फुलतात. जगभर गुलाब हा फुलांचा राजा म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रात महाबळेश्वर भागात जंगली वेली गुलाब आढळतात. भारतात देशी आणि विदेशी असे गुलाबाचे दोन प्रकार आहेत.

देशी गुलाब : या गुलाबाची अभिवृद्धी फांद्यांपासून सहज होते. काही गुलाबांना फुले फारच क्वचित येतात. त्यांचा उपयोग कलमे करण्यासाठी करतात. यांचे रोझा इंडिका आणि रोझा मल्टिफ्लोरा असे दोन प्रकार आढळतात. जास्त पावसाच्या प्रदेशात रोझा मल्टिफ्लोरा कलमे करण्यासाठी रुट स्टॉक म्हणून वापरतात.

देशी गुलाबात वेल व झुडपे असे प्रकार आहेत. पांढरी फुले झुबक्यांनी येणारी वेली प्रकार, गुलाबी फुलांचा वेली आणि लाल रंगाचा झुडपी असे दोन प्रमुख प्रकार आहेत. देशी गुलाबात रंग व पाकळ्यांची संख्या कमी, पण सुगंधी फुलांचे प्रमाण जास्त असते. गुलाबापासून अत्तर, गुलाबपाणी व गुलकंद करतात. यासाठी गावठी गुलाबी फुलांचा वेली प्रकार वापरला जातो.

जूनपासून त्याची लागवड करता येते. वातावरणात जेव्हा आद्र्रतेचे प्रमाण भरपूर असते तेव्हा फांद्या चांगल्या जगतात. पावसाच्या सुरुवातीला मातीत योग्य ओलावा व हवेत चांगली आद्र्रता असते. गावठी गुलाबी वेली प्रकार महाराष्ट्रात चांगला वाढतो. काटे थोडे मोठे असतात. गावठी गुलाबाच्या पाकळ्यांपासून गुलाबपाणी व गुलकंद करतात. जैन उपासना संप्रदायात गावठी गुलाबाची फुले मोठय़ा प्रमाणात वापरतात. देशी गुलाबांमध्ये मोठय़ा आकाराच्या वेलीसुद्धा आहेत. गुच्छाने फुले येणाऱ्या जातींमध्ये एकेरी पाकळ्यांची गुलाबी फुले व पांढऱ्या मध्यम आकाराची फुले अशा दोन जाती आहेत.

विदेशी गुलाब : यात पाकळ्यांची संख्या, रंगाची व आकाराची विविधता मोठय़ा प्रमाणात आहे. अतिशय मोहक रंग व सुंदर आकार असतात. यात सुगंधी जाती फार कमी आहेत. साधारणपणे उष्ण प्रदेशात सुगंधी फुलांचे प्रकार व शीत कटिबंधात सुंदर रंगाचे प्रकार जास्त आढळतात. एका फांदीवर एकच फूल पण भरपूर पाकळ्या व मोठा आकार हे हायब्रिड प्रकारात असतात. प्लोरिबंडा प्रकारात आकार लहान, पाकळ्या कमी पण फुले घोसाने लागतात. मिनिएचर प्रकारात लहान आकाराची (सुपारीएवढी) फुले पण वर्षभर येतात. पिलर रोझेस प्रकारात वेली, झाडांसारखी वाढ, झुबक्यात अथवा एच.टी.मधील फुले. आता हा प्रकार मागे पडला आहे.