योगस्नेह : बालासन

पोटावरील व कंबरेवरील चरबी कमी करण्यासाठी आणि वजन घटवण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त आसन आहे.

लहान मूल ज्याप्रमाणे पाय गुडघ्यात दुमडून झोपते, त्याप्रमाणे हे आसन करायचे असल्याने यास बालासन असे म्हणतात. हे आसन करण्यास सोपे असून खूपच लाभदायक आहे. पोटावरील व कंबरेवरील चरबी कमी करण्यासाठी आणि वजन घटवण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त आसन आहे. हे आसन नियमित केल्याने मानसिक शांतताही लाभते.

कसे करावे?

* पाय गुडघ्यात दुमडून खाली बसा. कंबर पायाच्या टाचेला लागली पाहिजे अशा स्थितीत बसणे आवश्यक आहे.

*  आता पुढच्या बाजूस वाकून डोक्यासह सर्व शरीर खाली घ्या. डोके जमिनीला टेकले पाहिजे.

*  हात पुढील बाजूस किंवा कंबरेच्या मागे घेतले तरी चालतील.

*  आता छातीने मांडीला दाब द्या.

*  काही वेळ याच स्थितीत राहा.

*  हळूहळू शरीर वर घेऊन आसन सोडा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Benefits of balasana