सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसात छत्री तर हवीच! जुनी छत्री चांगल्या स्थितीत असेल पण दरवर्षी तीच तीच काय वापरायची, असं वाटत असेल, तर जुन्याच छत्रीला नवं रूप देता येणं सहज शक्य आहे. नवीनच घ्यायला हवी असं काही नाही. छत्रीचा चेहरामोहरा कसा बदलता येईल, ते पाहू या..

साहित्य :

अ‍ॅक्रेलिक रंग, ब्रश, रंग कामाचे साहित्य, कात्री, पेन्सिल, गम, कागद.

कृती

*  कागदावर पेन्सिलने हवे ते सोप्पे चित्र रेखाटा.

* चित्राचा आकार कापा.

* छत्रीवर सुंदर रचना करून हलकेच चिकटवा.

* कापडी बोळा अक्र्यलिक रंगात बुडवा व चिकटवलेल्या आकारच्या बाहेर रंगवा.

* पूर्ण वाळल्यावर कागदी आकार काढून टाका.

* तुमच्या छत्रीचे बदललेले रूप तुम्हालाच आनंद देईल.

* जाड ब्रशने तुम्ही तुमच्या नावाचे अद्याक्षरसुद्धा रंगवू शकाल.

* अक्षराचे डिझाइन पण करता येईल.

apac64kala@gmail.com