kalaविविध प्रकारचे कौशल्य प्राप्त असलेल्या व्यक्तींना रोजगार आणि स्वयंरोजगार करणे सोपे जाते. सराव आणि अनुभवाने त्यांच्या कौशल्यात वाढ होते. त्यातून प्रगतीच्या संधीही वाढत जातात. या बाबी लक्षात घेऊन केंद्र सरकारमार्फत ‘हुनर से रोजगार तक’ ही योजना कौशल्यनिर्मितीसाठी राबवली जात आहे.

या योजनेंतर्गत मुंबईस्थित इन्स्टिटय़ूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, कॅटिरग टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड अ‍ॅप्लाइड न्युट्रिशन या संस्थेने हॉटेल आणि खानपान व्यवसायाशी निगडित अल्पावधीचे विविध अभ्यासक्रम सुरू केले आहेत. ही संस्था केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे.
हे अभ्यासक्रम केल्यानंतर छोटी उपाहारगृहे, गेस्ट हाऊसेस येथे नोकरीच्या संधी मिळू शकतात तसेच छोटय़ा प्रमाणात स्वत:चा व्यवसाय सुरू करून भविष्यात मोठी झेपसुद्धा घेता येऊ शकते.
या योजनेअंतर्गत कुकरी, बेकरी, फूड आणि बिवेरेजेस सíव्हस, हाऊसकीिपग युटिलिटी, इव्हेंट फॅसिलेटर हे अभ्यासक्रम करता येतात. यापकी कुकरी आणि बेकरी हे अभ्यासक्रम प्रत्येकी आठ आठवडय़ांचे तर इतर सर्व अभ्यासक्रम प्रत्येकी सहा आठवडय़ांचे आहेत.
गणवेश आणि साहित्य (टूल किट) मोफत दिले जाते. या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने प्रत्यक्ष हॉटेलमध्ये प्रशिक्षण दिले जाते. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर प्रवेश परीक्षा घेतली जाते. यशस्वी उमेदवारांना पर्यटन मंत्रालय, संबंधित हॉटेल आणि नॅशनल कौन्सिल ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड कॅटिरग टेक्नॉलॉजीमार्फत संयुक्तरीत्या प्रमाणपत्र दिले जाते.
आठवी उत्तीर्ण कोणत्याही व्यक्तीला हे अभ्यासक्रम करता येतात. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा १८ ते २५ वर्षे आहे. ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश’ या तत्त्वावर अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जातो.
फूड आणि बिवेरेजेस सíव्हस, हाऊसकीिपग युटिलिटी आणि इव्हेंट फॅसिलेटर या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना १,५०० रुपये, तर कुकरी आणि बेकरी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना २,००० रुपये विद्यावेतन दिले जाते. विद्यार्थ्यांची उपस्थिती किमान ९० टक्के असायला हवी.
या अभ्यासक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी आवश्यक असणाऱ्या कौशल्याची निर्मिती करणे हा आहे. अभ्यासक्रमासाठी निवड होणे याचा अर्थ नोकरी अथवा रोजगाराची हमी मिळणे नव्हे, ही बाब लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
पत्ता- इन्स्टिटय़ूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, कॅटिरग टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड अ‍ॅप्लाइड न्युट्रिशन, व्ही. एस. मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई- ४०००२८, वेबसाइट- http://www.ihmctan.edu
ई-मेल- info@ihmctan.edu