जागतिकीकरणाच्या युगात उत्तम इंग्रजी बोलता येणे महत्त्वाचेच नव्हे तर अपरिहार्य बनले आहे. इंग्रजीतून उत्तम संभाषण करता येणं आणि इंग्रजी लेखनकौशल्यात पारंगत असणं आज करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहे.. तसे म्हटले तर आपण सगळेच इंग्रजी भाषेशी परिचित आहोत. दैनंदिन कार्यालयीन कामकाजातही आपण इंग्रजी वापरतो. आपल्यापकी अनेकांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळा-महाविद्यालयांतून शिक्षणही घेतलेले असेल. तरीही आयत्या वेळी इंग्रजीत संभाषण किंवा प्रेझेंटेशन करायची वेळ आली तर आपण कचरतो. इंग्रजीमधून आपले विचार नीट मांडता येतील का? चपखल शब्द सुचतील का? अशा शंका मनात डोकावतात. या भीतीवर मात करण्यासाठी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व संपादन करणे आवश्यक आहे.भाषिक अडचणीमुळे एखादी व्यक्ती अडखळत किंवा विचार करत बोलते. ऐकणाऱ्याचा असा समज होऊ शकतो की बोलणाऱ्या व्यक्तीला विषयाची आवश्यक तितकी माहिती नसल्यामुळे ती अडखळतेय. भाषेवर प्रभुत्व प्राप्त केले, की आपल्या कार्यक्षमतेविषयीचे असे गरसमज टाळता येतात. मातृभाषेइतकेच सहज इंग्रजीतून बोलता आले पाहिजे. कोणतीही पूर्वतयारी किंवा जुळवाजुळव केल्याशिवाय उत्तम संभाषण करण्याएवढी भाषेवर पकड असायला हवी. ही प्रक्रिया थोडी कठीण वाटणे स्वाभाविक आहे. पण चिकाटीने रोज सराव केल्यास इंग्रजी भाषाकौशल्य नक्की सुधारता येते. इंग्रजी संभाषण सुधारण्यासाठी रोज करता येण्याजोग्या काही गोष्टी-

भाषेच्या सतत संपर्कात राहा
एखाद्या भाषेच्या सतत व अधिकाधिक संपर्कात राहिले की ती शिकणे अधिक सोपे बनते. पण आपण नेमके उलट वागतो. सहसा आपण कठीण वाटणारी गोष्ट टाळतो. इंग्रजी भाषेच्या सतत सहवासात राहा. दिवसभर इंग्रजी कानावर पडू द्या. इंग्रजी वृत्तपत्रे वाचा, इंग्रजी गाणी ऐका, चांगल्या इंग्रजी मालिका व चित्रपट पाहा. जितकी भाषेशी अधिक ओळख होईल, तितक्या लवकर तिच्याशी घनिष्ठ मत्री जमेल.

parents advice on career goal
चौकट मोडताना : ठेच खाऊन आलेले शहाणपण
Marathi Serial World First AI Experiment
मराठी मालिका विश्वातील पहिलावहिला ‘एआय’ प्रयोग
loksatta analysis telangana police closure report claim rohit vemula was not a dalit
विश्लेषण : रोहित वेमुला दलित नव्हता? तेलंगणा पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमधील दाव्याने खळबळ का उडाली?
Broadcaster Science Inculcation of scientific approach in India Prof R v Sowani
विज्ञान प्रसारकाची जन्मशताब्दी..
israil
लेख: गाझा संहार : अमेरिका काय करणार?
Stridhan belongs to the woman husband has no right over it
स्त्रीधन महिलेचेच, त्यावर पतीचा अधिकार नाही…
generative artificial intelligence marathi news
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या भविष्यात डोकावताना…
It is important to be careful while buying a home
सावधानपणे व्यवहार करणे आवश्यक !

7लेखन
‘दिसामाजी काहीतरी ते लिहावे’ याप्रमाणे रोज निदान चार-पाच ओळी तरी इंग्रजीमध्ये लिहा, मग ती कामांची यादी असो, फेसबुक अपडेट असो अथवा सहकाऱ्याकरिता ठेवलेला एखादा निरोप. इंग्रजीमध्ये डायरी किंवा ब्लॉग लिहा. लिहिताना व्यवस्थित विचार करून वाक्यरचना करता येते आणि मग सरावाने ती बोलण्यातही उतरते.

आत्मविश्वास बाळगा
भाषा शिकताना चुका होणारच. अशा चुकांमुळे इंग्रजी बोलण्याचे सोडून मात्र देऊ नका. ‘इंग्लिश विंग्लिश’मधील अमिताभच्या पात्राने दिलेला कानमंत्र लक्षात ठेवा- ‘बेशक बेफिकर बिनधास्त इंग्रजी बोला.’
सर्वात महत्त्वाचे म्हणजे इंग्रजी एन्जॉय करा. नवीन भाषा शिकताना आपल्याला मिळतात नवे अनुभव, नवे विचार, एक नवी संस्कृती.. या नवीन दृष्टिकोनाचा आनंद घ्या. मग भाषा आत्मसात करणे एक कंटाळवाणा अभ्यास न राहता एक रसरशीत जिवंत अनुभव होईल.

6वाचन वाढवा
शब्दसंपत्ती वाढावी, यासाठी आपण शब्दकोश उघडतो तर व्याकरणासाठी नियमावलीचा आधार घेतो. असे केल्यास इंग्रजी क्लिष्ट व असाध्य वाटू लागते. या दोन्हींसाठी सोपा मार्ग आहे वाचन. उत्तम इंग्रजी पुस्तके व लेख वाचल्यास उत्तम दर्जाची भाषा आत्मसात व्हायला मदत होते. मात्र, इंग्रजी पुस्तके वाचताना भाषेकडे विशेष लक्ष द्यायला हवे. लेखकाने वापरलेले शब्द आणि वाक्यांची रचना लक्षात घ्या. चांगले शब्द / वाक्ये अधोरेखित करून पुन: पुन्हा वाचा. ती लक्षात ठेवून रोजच्या संभाषणात वापरण्याचा प्रयत्न करा. उदा.
kI donlt think so. च्या ऐवजी I have a different opinion on this issue. वापरल्यास ते अधिक प्रभावी वाटेल.
तसेच Wait a minute, I will answer you पेक्षा Could you put that question on hold for a minute?l म्हणणे सयुक्तिक ठरेल.
वेळेअभावी आपण पुस्तके / वृत्तपत्रे वाचण्याचा कंटाळा करतो. इंटरनेट व मोबाइल फोन क्रांतीने ही तक्रारही नष्ट केली आहे. केव्हाही कुठेही थोडासा वेळ मिळाल्यास वाचन करणे सहज शक्य झाले आहे. चांगल्या नियतकालिकांच्या वेबसाइट्स तसेच विविध विषयांवरचे ब्लॉग्ज क्षणार्धात शोधता येतात. बसस्टॉपवरील १५ मिनिटे किंवा मीटिंग रद्द झाल्यामुळे मिळालेला अर्धा तास आता इंग्रजी वाचून सहज सत्कारणी लावता येईल.आपल्या क्षेत्राशी संबंधित लेख / ब्लॉग्ज वाचून भाषा तर सुधारतेच, त्याबरोबर व्यवसायातील नवीन घडामोडींची माहितीदेखील मिळते.

ऐका व बोला
चांगले इंग्रजी ऐका. उच्चारांकडे तसेच आवाजाच्या चढ-उताराकडे विशेष लक्ष द्या. स्वत: बोलताना या शैलीची नक्कल करण्याचा प्रयत्न करा. NatGeo किंवा History Channel वरच्या माहितीपटांचे निवेदन नियमित ऐका. इंटरनेटद्वारे विविध विषयांवर podcasts प्रसारित केले जातात. हे रेडिओसारखे केव्हाही ऐकता येतात.
अधिकाधिक लोकांशी इंग्रजीमध्ये बोला. सुरुवातीला कधी योग्य शब्द सापडणार नाहीत तर कधी व्याकरणाच्या चुका होतील. तरीही इंग्रजी बोलत राहा. सतत सराव केल्याने आत्मविश्वास वाढेल व बोलणे अधिक सहज होईल.
इंग्रजी बोलताना इंग्रजीमध्येच विचार करण्याचा प्रयत्न करा. अनेकदा आपण मराठीत वाक्य योजून त्याचे शब्दश: भाषांतर करतो. मग She is angry WITH me ऐवजी आपण She is angry ON me म्हणतो तर कधी उंल्ल Can you click a photo of us? च्या जागी Can you remove a photo of us? वापरतो. दोन्ही भाषांची वाक्यरचना वेगळी असल्याने अर्थाचा गोंधळ निर्माण होऊ शकतो.

शब्दसंपत्ती वाढवा
’अस्खलित संभाषण करण्यासाठी सर्वप्रथम योग्य शब्द माहिती असायला हवेत. याकरिता शब्दसंपत्ती वाढवली पाहिजे. इंग्लिशमध्ये दीड लाखांहून अधिक शब्द आहेत व दर वर्षी काही नवीन शब्द भाषेत समाविष्ट केले जातात. आपण मात्र आपली शब्दसंपत्ती वाढवताना आपल्या करिअरच्या गरजेवर लक्ष केंद्रित करावे. आपल्या क्षेत्रात नेहमी वापरायला आवश्यक असे अधिकाधिक शब्द आत्मसात करावेत.
’अनेकदा दोन शब्द एकसारखे असल्याने गोंधळ निर्माण करतात. उदा.Respective (अनुक्रमे) व Respected (आदरणीय) किंवा Accept (स्वीकारणे) व Except (वगळता) अशा शब्दांच्या योग्य वापराकडे विशेष लक्ष द्या. ’रोज किमान पाच नवीन शब्द शिका. त्यांचा अर्थ समजावून घ्या व ते वाक्यात वापरण्याचा प्रयत्न करा. केवळ शब्द व अर्थाचे पाठांतर फारसे उपयोगी पडत नाही.
’फ्लॅशकार्ड्स वापरल्यास नवीन शब्द शिकणे खूप सोपे होऊन जाते. हल्ली तर ही फ्लॅशकार्ड्स ंस्र्स्र् च्या स्वरूपातही उपलब्ध आहेत. काही apps मोबाइल फोन / लॅपटॉपच्या screensaver वर नवीन शब्द अर्थासहित दाखवत राहतात. कळत-नकळत हे शब्द आपल्या ओळखीचे होऊन जातात. Visual Thesaurus हे नवीन शब्द शिकण्यासाठी एक सोपे Word games किंवा शाब्दिक खेळांचे अनेक apps मोबाइल फोनवर मोफत उपलब्ध आहेत. फावल्या वेळात कॅण्डी क्रशच्या स्कोअरबरोबरच शब्दसंपत्ती वाढवायला काहीच हरकत नाही. इंग्लिशमध्ये प्रत्येक बारीकसारीक अर्थासाठी चपखल योजता येतील असे अनेक शब्द आहेत, मात्र ते वापरात आणले पाहिजेत. एखादे गाणे, एखादी डिश किंवा एखादा गमतीदार किस्सा आवडला की आपण पटकन Awesome अशी प्रतिक्रिया देतो. गाण्याला delicious व गमतीला humourous म्हणून पाहा, चपखल शब्द वापरण्याची मजा काही औरच आहे.

गायत्री गाडगीळ
विभागप्रमुख, इंग्रजी विभाग, डी. जी. रूपारेल महाविद्यालय, माटुंगा
gayatri.gadgil@gmail.com