Palghar Accident Viral Video: रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अपघाताचा भयानक असा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. अवघ्या १० सेकंदाचा हा अपघात आहे. ज्यात धडाधड गाड्या एकमेकांना ठोकल्या आहेत. काही क्षणात कित्येक जीव गेले आहेत. काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक पालघरमधून लाइव्ह अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे. हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे, ज्याला पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे.हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्याही काळजाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. हा अपघात एवढा भयानक आहे की याचा व्हिडिओ पाहून कुणाच्याही अंगावर काटा उभा राहील.

पालघरमध्ये अपघाताचं भयंकर दृश्य जे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे. हा अपघात पाहिल्यावर तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. भयंकर अपघात झाला आहे. एका ट्रकने एका डम्परला धडक दिली. त्यानंतर त्या डम्पर आणि ट्रकच्या मधली कार अक्षरश:दबली गेली. पाच गाड्यांचा हा विचित्र असा अपघात आहे. जो फक्त १० सेकंदात घडला आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा भिवंडी महामार्गावर हा भीषण अपघात झाला.

puneri pati viral there is no love like father Emotional Slogan Written Behind puneri riksha Video
“आज पाहिलेली सगळ्यात भारी पुणेरी पाटी” रिक्षामागची पाटी पाहून व्हाल भावूक; पुण्यातला VIDEO व्हायरल
Vasai, fake police, keychain,
वसई : एका कीचेनमुळे फुटले नकली पोलिसाचे बिंग
Agra Suicide Video
Video: बॉयफ्रेंडशी स्टेशनवर भांडण झाल्यानंतर तरुणीने धावत्या रेल्वेसमोर मारली उडी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद
a girl who was got caught stealing things at megamrt in Varanasi video goes viral
VIDEO : मॉलमध्ये चोरी करताना तरुणीला रंगहाथ पकडले, जाब विचारताच… पाहा, व्हायरल होतोय व्हिडीओ
Viral Video Girls Fall Down badly on scooty
आधी स्टाईल मारली मग स्कूटीवरुन धपकन पडल्या तरुणी; ‘हा’ VIDEO पाहून पोट धरुन हसाल
If You Dont Believe In Luck And Karma Then Just Watch This Video how man skip death
नशीब आणि कर्मावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; अवघ्या ३ सेंकदात तरुणासोबत नेमकं काय घडलं?
Water Increased Many People Drowing In Water Scary Video Viral
मृत्यूपूर्वीचा शेवटचा Video! अचानक पाणी वाढलं, पर्यटकांनी एकमेकांना घट्ट पकडून ठेवलं पण शेवटी…
Police found dead body of a man in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? ८ तास तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला

या अपघाताचा सीसीटीव्ही समोर आला आहे. पाच वाहनांचा झालेला विचित्र अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. वाडा भिवंडी महामार्गावर कुडूस येथे हा अपघात झाला. अचानक मागून येणारा एक ट्रक पुढच्या डम्परला धडकतो. त्यामुळे कार चिरडली जाते. ज्या एका ट्रकमुळे हा असा अपघात झाला, तो ट्रक तिथं थांबतो पण पेट घेतो. गाडीचा वेग असल्यामुळे गाडी अनियंत्रीत झाली आणि हा अपघात झाल्याचं दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> मोबाईलचा डिस्प्ले गेल्यावर आता काळजी करु नका; पैसे खर्च न करता फक्त ‘हा’ जुगाड करा; VIDEO पाहून व्हाल अवाक्

हा व्हिडीओ सोशल मीडियावर kasakaipalghar नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले असून नेटकरी हा अपघात पाहून थक्क झाले आहेत. व्हिडीओ पाहून नेटकरी संताप व्यक्त करत प्रतिक्रिया देत आहेत. एकजण म्हणतोय, “अति घाई संकटात नेई,” तर दुसऱ्या एका युजरने “या लोकांसाठी १० वर्ष कैद आणि ७ लाखांचा दंड हाच कायदा बरोबर आहे “असं म्हंटलंय.