अर्थसाक्षरता वाढण्यासाठी उपयुक्त ठरतील अशा अल्पमुदतीच्या काही अभ्यासक्रमांबद्दल जाणून घेऊयात..

संपत्ती व्यवस्थापनाविषयीची अधिकाधिक व्यक्तींना माहिती व्हावी आणि शेअर बाजारातील व्यवहार कसे करायचे असतात, हे त्यांना जाणून घेता यावे, यासाठी गेल्या काही वर्षांत संस्थात्मक पातळीवर प्रयत्न होत आहेत.  आज गुंतवणुकीच्या पारंपरिक पद्धतीच्या पलीकडे बघणे आवश्यक बनले आहे. पारंपरिक बचतीचे मार्ग म्हणजे पोस्टातल्या ठेवी, बँकेतील फिक्स डिपॉझिट्स. आज विमा योजनांकडेही गुंतवणुकीचे साधन म्हणून बघितले जाते. मात्र, सुरक्षितता असली तरी त्यातून वृद्धी मात्र साध्य होत नाही. शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडातील दीर्घकालीन गुंतवणुकांमध्ये जशी जोखीम असते, तशी मिळकतही! मात्र या सर्व बाबींचा सातत्याने अभ्यास आणि सराव आवश्यक ठरतो.
शेअर मार्केट, म्युच्युअल फंडांतील गुंतवणूक आदींविषयक बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज इन्स्टिटय़ूटमध्ये अल्प मुदतीचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. यातील अभ्यासक्रम दोन दिवसांपासून एक महिन्याच्या कालावधीपर्यंत असतात. या अभ्यासक्रमाद्वारे गुंतवणुकीबाबत प्राथमिक माहिती मिळून मनातील अनेक शंकाकुशंका दूर व्हायला मदत होते. या संबंधीचे करिअर अथवा व्यवसाय करण्यात रस असेल तर या अभ्यासक्रमांद्वारे मिळणारे ज्ञान उपयुक्त ठरू शकते. यासंबंधी सतत वाचन, अभ्यास आणि व्यवहार करत राहिलात तर गुंतवणूक संदर्भातील समज नक्कीच वाढते.

अर्थविषयक काही अभ्यासक्रम..

’बेसिक कोर्स ऑन स्टॉक मार्केट.
कालावधी- चार दिवस. अर्हता- कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण. स्टॉक ब्रोकर, सबब्रोकर तसेच कोणताही गुंतवणूकदार हा अभ्यासक्रम करू शकतात.

’अ‍ॅडव्हान्स्ड कोर्स ऑन स्टॉक मार्केट. कालावधी- आठ दिवस.

’फायनान्शिअल स्टेटमेंट अ‍ॅनालिसिस.
कालावधी- एक दिवस.

’हाऊ टू रीड म्युच्युअल फंड फॅक्ट्स शिट.
कालावधी- दोन दिवस.

’सर्टििफकेट प्रोग्रॅम ऑन स्टॉक
मार्केट. कालावधी- दोन दिवस.

’फंडामेंटल्स ऑफ म्युच्युअलफंड.
कालावधी- दोन दिवस. 

’कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रोग्रॅम ऑन इक्विटी रिसर्च, कालावधी- सहा दिवस.

’सर्टििफकेट प्रोग्रॅम ऑन कॅपिटल मार्केट- कालावधी दहा आठवडे, अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी.

’सर्टििफकेट प्रोग्रॅम ऑन टेक्निकल अ‍ॅनालिसिस, कालावधी- पाच आठवडे.

’इंटरनॅशनल सर्टििफकेट इन वेल्थ अ‍ॅण्ड इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट, कालावधी- दहा आठवडे.

’सर्टििफकेट प्रोग्रॅम ऑन रिस्क मॅनेजमेंट.

संपर्क- बीएसई इन्स्टिटय़ूट लिमिटेड १८ आणि १९ वा मजला, पी. जे. टॉवर्स, दलाल स्ट्रीट, मुंबई- ४००००१ ईमेल -admissions@bseindia.com/ @bseindia.com वेबसाइट- http://www.bsebti.com