Kartiki Gaikwad Baby Boy : कार्तिकी गायकवाड ही ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या रिअ‍ॅलिटी शोमुळे घराघरांत लोकप्रिय झाली. ‘लिटिल चॅम्प्स’चं पहिलंच पर्व कार्तिकीने जिंकलं होतं. पुढे, कार्तिकी हळुहळू गाण्यांचे कार्यक्रम घेऊ लागली. मराठी मनोरंजनसृष्टीतील असंख्य गाण्यांना कार्तिकीने आवाज दिला आहे. वैयक्तिक आयुष्यात २०२० मध्ये कार्तिकीने रोनित पिसेशी लग्नगाठ बांधली.

लग्नाला चार वर्षे पूर्ण झाल्यावर कार्तिकीने काही महिन्यांआधीच आई होणार असल्याची गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. तिच्या डोहाळे जेवणातील बरेच फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यानंतर गायिकेने १४ मे रोजी इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत आई झाल्याची आनंदाची बातमी तिच्या चाहत्यांना दिली.

हेही वाचा : मराठी बॉक्स ऑफिस गाजवल्यावर ‘नाच गं घुमा’चा परदेशात डंका! अमेरिकेसह ‘या’ देशांमध्ये होणार स्क्रीनिंग, जाणून घ्या…

कार्तिकी गायकवाड व रोनित पिसे यांना मुलगा झाला आहे. सध्या कलाविश्वातून कार्तिकवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. अशातच अभिनेत्रीने बाळाच्या जन्मानंतर डोहाळे जेवणातील एक Unseen व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये तिच्या माहेरच्या आणि सासरच्या संपूर्ण कुटुंबाची झलक पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : “तुझ्यासारख्या दिग्गज, बलाढ्य अभिनेत्रीसमोर…”, मुक्ता बर्वेच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावने लिहिली सुंदर पोस्ट

“मी एका नव्या आणि वेगळ्या भूमिकेत आता जातेय…ही म्हणजेच आईची भूमिका. त्यामुळे आता एक नवीन जबाबदारी असणार आहे. याशिवाय आनंद सुदधा आहेच. प्रत्येक बाईसाठी हा दुसरा जन्म असतो. त्यामुळे माझ्याबरोबर सुद्धा तेच होणार आहे एक नवीन जबाबदारी, आनंद सगळंच आहे असं मला वाटतं.” असं कार्तिकीने या व्हिडीओमध्ये सांगितलं.

कार्तिकीचे वडील म्हणाले, “आजवर कार्तिकीला भरभरून प्रेम मिळालंय. माझ्या लेकीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम संपन्न होतोय हा खऱ्या अर्थाने माझ्या जीवनातला आनंदाचा क्षण आहे.” याशिवाय व्हिडीओच्या शेवटी गायिकेने बाळासाठी खास गाणं गायलं. नेटकरी या व्हिडीओचं भरभरून कौतुक करत आहे.

हेही वाचा : अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ जाणार दुबईला! परदेशात करणार LIVE सादरीकरण, जाणून घ्या…

मार्च महिन्यात कार्तिकीने ती आई होणार असल्याचं जाहीर केलं होतं. डोहाळे जेवणाच्या या व्हिडीओमध्ये कुणीतरी येणार येणार गं! असा संदेश लिहिलेली भव्य रांगोळी, कार्तिकीची नवऱ्यासह ग्रॅन्ड एन्ट्री व अन्य कुटुंबीयांची झलक पाहायला मिळात आहे. आता कार्तिक आपल्या बाळाचं नाव काय ठेवणार याकडे तिच्या चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.