बिझनेस मॅनेजमेंट रिअल इस्टेट मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूटतर्फे रिअल इस्टेट बिझनेस मॅनेजमेंट अ‍ॅण्ड हाऊसिंग फायनान्स हा अभ्यासक्रम चालवण्यात येतो. या अभ्यासक्रमात व्यवसाय व्यवस्थापन कौशल्य, रिअल इस्टेट आणि गृहनिर्मिती/कर्जासाठी आवश्यक असणारे वित्तीय ज्ञान आणि कायदेशीर बाबींची पूर्तता, गृहविक्री संदर्भात ग्राहकांशी संबंधित बाबींची प्रक्रिया, मनुष्यबळ विकास, व्यावसायिक मूल्ये आणि शिस्त, सादरीकरण कौशल्य, विश्लेषणात्मक कौशल्य, व्यवस्थापन संगणकीय माहिती प्रणाली, संसाधनाची प्रभावी हाताळणी, अहवाल लेखन या बाबींचे प्रशिक्षण दिले जाते. रिअल इस्टेट क्षेत्रात करिअर करण्यासाठी या बाबी उपयुक्त ठरतात. हा अभ्यासक्रम अल्पावधीचा असून वर्गातील प्रशिक्षण आणि इंटर्नशिप यांचा कालावधी ६०० तासांचा आहे. हा अभ्यासक्रम कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण उमेदवाराला करता येतो. हा अभ्यासक्रम केल्यावर ‘सर्टफिाइड प्रोफेशनल इन रिअल इस्टेट बिझनेस मॅनेजमेंट अ‍ॅण्ड हाऊसिंग फायनान्स’ हे प्रमाणपत्र दिले जाते.
पत्ता- रिअल इस्टेट मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूट, ३४, एव्हरग्रीन इंडस्ट्रियल इस्टेट,, महालक्ष्मी,
मुंबई- ४०००११. वेबसाइट- http://www.remi.edu.in
ईमेल- enqiry@remi.edu.in

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व Learn इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Real estate study courses
First published on: 30-09-2015 at 08:20 IST