काम करताना अनेकदा आपलं लक्ष विचलित होतं. कामातून लक्ष उडण्यामागची कारणं अनेक असू शकतात.. काम करताना आपल्याला फोन येतात, ई-मेल्स येतात, कधी आपण काम करताना इंटरनेट धुंडाळतो, मित्रमंडळी अफलातून एसेमेस पाठवतात. दर वेळेस आपल्या कामात व्यत्यय येत असतो, पण त्याची कारणं मात्र वेगवेगळी असतात. एका पाहणीत असे आढळून आले आहे की, कामाचा व्यत्यय अवघा २-३ सेकंदांचा जरी असला तरी त्यामुळे चुका होण्याची शक्यता वाढते. व्यत्यय आल्यानंतर पुन्हा कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी सरासरी २५ मिनिटांचा अवधी लागतो..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कामाच्या ठिकाणचे सर्वसाधारण अडथळे
’कामात व्यत्यय आणणारं सर्वात आघाडीचं कारण म्हणजे तंत्रज्ञान. कामाच्या वेळेत किमान एक तास तरी व्यक्तिगत फोन, ई-मेल्स, एसेमेसमध्ये जातो, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. अनेकांचा सर्वाधिक वेळ इंटरनेटवर कामाव्यतिरिक्तची माहिती धुंडाळण्यात जातो.
’कोणत्या कारणांमुळे तुमचे लक्ष कामातून उडते हे लक्षात घेण्याचा प्रयत्न केला तर असे दिसून येते की, सहकाऱ्यांचं मोठय़ा आवाजातील बोलणं, तुम्हाला येणारे भारंभार ई-मेल्स, डेडलाइन जवळ आल्याने येणारा तणाव, कामाच्या ठिकाणच्या वातावरणात मोबाइल फोन्सचा वाढलेला वावर या सगळ्यांमुळे कामात व्यत्यय येऊ शकतो.
’कधी कधी काम करताना तुमचा सहकारी तुमच्याशी गप्पा मारायला किंवा एखाद्या मुद्दय़ावर तुमचं मत विचारायला येतो. काही वेळ झाल्यावर तुमच्या लक्षात येतं की, कामासाठी फार कमी वेळ तुमच्यापाशी शिल्लक राहिला आहे.. सहकाऱ्यांशी संवाद हा महत्त्वाचा असतो, पण जर तो तुमच्या कामात बाधा आणणारा असेल तर तो तुम्हाला महागात पडू शकतो. यावर उपाय म्हणजे, काम करताना तुमच्याशी गप्पा मारायला आलेल्या सहकाऱ्याला तुमच्या कामाच्या डेडलाइनची कल्पना द्या आणि आपण नंतर बोलूयात असे सांगा. तुमच्या भोवताली खूप आवाज असेल तर सौम्यपणे त्यांना आवाजामुळे कामात व्यत्यय येत असल्याचे सांगा. मुभा असल्यास महत्त्वाचे काम करताना भोवताली आवाज असल्यास कॉन्फरन्स रूम अथवा इतर शांत जागी जाऊन काम करा.

मराठीतील सर्व Learn इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ways to boost concentration at work
First published on: 02-12-2015 at 06:07 IST